Thursday, January 8, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : १७ ऑगस्ट २०२४ - कोणाच्या तरी हास्याचे कारण व्हा

संपादकीय : १७ ऑगस्ट २०२४ – कोणाच्या तरी हास्याचे कारण व्हा

कोणाच्या तरी हास्याचे कारण व्हा’ ही यावर्षीच्या जागतिक अवयवदान दिवसाची संकल्पना होती. सांगली जिल्ह्यात बत्तीस शिराळा गावातील एक बहीण ती संकल्पना शब्दशः जगली आणि तिने अनोख्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी केली.गायकवाड कुटुंबातील भावाची तब्येत अचानक बिघडली. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत म्हटले आहे.

डॉक्टरांनी दोन्ही किडन्या पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे निदान केले आणि किडनी प्रत्यारोपणाची गरज व्यक्त केली. बहिणीने भावाला किडनी दान केली. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अवयवदानाचे दोन प्रकार सांगितले जातात. एक जिवंतपणी केले जाणारे आणि दुसरे मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्यांनतर अशा रुग्णाचे अवयवदान करणे. उपरोक्त घटनेतील बहिणीने पहिल्या प्रकारात मोडणारे दान केले आहे.

- Advertisement -

अवयवदानाच्या प्रतीक्षेत लाखो व्यक्ती असतात. ज्या कोणीतरी पुढाकार घेईन आणि त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलेल याच्या प्रतीक्षेत असतात. गरजूंच्या तुलनेत दात्यांची संख्या नेहमीच व्यस्त असते. ती उणीव ठरवले तर भरून काढणे शक्य होऊ शकेल. पण त्यासाठी लोकांना अवयवदानाविषयीचे गैरसमज दूर सारावे लागतील. दुर्दैवाने अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजातील सर्व क्षेत्रे व्यापून आहेत. त्याला अवयवदानही अपवाद नाही. विशिष्ट अवयवच दान केले जाऊ शकतात. दात्याचे शरीर विद्रुप होते. खर्च दात्याच्या कुटुंबीयांनाच करावा लागतो.

YouTube video player

जिवंतपणी अवयवदान करणार्‍या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. हे त्यापैकीच काही गैरसमज. ज्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक कार्यकर्ते काम करतात. ज्याचा फायदा लोकांनी ज्ञान वाढवण्यासाठी केला जाऊ शकेल. किडनी दिलेली बहीण आणि ती स्वीकारलेला भाऊ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. उपरोक्त अनेक गैरसमजांचा त्यांनी त्यांच्या कृतीतून नायनाट करण्याचा प्रयत्न केला आहे.

अवयवदात्याच्या मृत्यूनंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भारतीय संस्कृतीत दानाचे अपरंपार महत्व सांगितले आहे. दानाचे महत्त्व मनामनावर ठसवणार्‍या अनेक गोष्टी आणि कथा सांगितल्या जातात. अवयवदान तर जीवनदान करू शकते. त्यामुळे गरजूंच्या आयुष्यात नवी पहाट उगवू शकते. निकामी अवयवाच्या वेदनांनी भरलेल्या चेहर्‍यावर हास्य फुलवू शकते. त्यासाठी गरज आहे ती समाजाने पुढाकार घेण्याची.

इच्छुक व्यक्तींनी तसे लिहून ठेवण्याची आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या नातेवाईकांनी त्याला मूर्त स्वरूप देण्याची. अर्थात ही प्रक्रिया सोपी अजिबात नाही. कसोटी पाहणारीच आहे. तथापि बत्तीस शिराळा गावातील एका बहिणीने ती कसोटी पार केली आहे. तिचा निर्धार आणि धाडस समाजासाठी प्रेरणादायी ठरावे.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...