Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २ डिसेंबर २०२४ - अजून किती स्वप्ने उध्वस्त होणार? 

संपादकीय : २ डिसेंबर २०२४ – अजून किती स्वप्ने उध्वस्त होणार? 

अजून किती बळी गेले म्हणजे वाहनचालकांची अती वेगाची नशा ओसरणार आहे? याच वेडाने उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा पाच लोकांनी त्यांचा जीव गमावला. अपघातानंतरच्या वाहनाच्या स्थितीवरून वाहनाचा वेग किती असावा याचा अंदाज कोणालाही यावा. अती वेगाबरोबर वाहनचालकाला डुलकीही आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रस्ते अपघात आणि त्यातील बळी यांची संख्या वाढतच आहे. बळींमधे तरुणांची वाढती संख्या हाही चिंतेचा विषय आहे.

सरकार आणि सामाजिक संस्था यांनी अजून काय प्रयत्न केले म्हणजे अपघातांची आणि पर्यायाने त्यातील बळींची संख्या कमी होऊ शकेल? रस्त्यांचा दर्जा सुधारावा आणि वाहतुकीचा वेग वाढवावा अशी वाहनचालकांची मागणी असते. वाहतूक जामचाही वैताग असतो. यावर समृद्धी महामार्गाचे उदाहरण घेता येऊ शकेल. सरकारने हा महामार्ग बांधताना वेग आणि यामधील सगळे अडथळे पार केले. तथापि त्या मार्गावरच्या अपघातांनाचे एक कारण वाहनांचा अती वेग हे आहेच आणि तो कमी कारण्यासाठी पुन्हा अडथळे निर्माण करण्याची वेळ सरकारवर आली. त्यासाठी समित्या नेमाव्या लागल्या. पुन्हा एकदा अभ्यास करावा लागला.

- Advertisement -

सरकारची भलावण करण्याचा हा प्रयत्न अजिबात नाही. दर्जेदार रस्ते देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. तसेच नियमांचे पालन ही वाहनचालकांची जबाबदारी आहे. ते कधी शिकणार आणि उद्याच्या पिढीला कधी शिकवणार? अपघात बळींमधे युवांच्या जास्त संख्येबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. या बळींमुळे त्यांचे घर भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतेच पण देशाचेही ते नुकसानच. उत्तर प्रदेश घटनेत बळी पडलेले पाचही तरुण डॉक्टर होते. काही जण त्यातील उच्च शिक्षण घेत होते. त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली असतील.

समाजात लोकसंख्या आणि त्या तुलनेत डॉक्टर्सचे प्रमाण कायम व्यस्तच आढळते. या पार्शवभूमीवर समाजाने पाच डॉक्टर्स हकनाक गमावले. शिक्षित माणसांनाही वेगातील धोका कळू नये का? वाहनाचा वेग वाढला तर किती प्रवासी त्याला आक्षेप घेतात आणि वाहनचालकाला हटकतात? चालकाला पुरेशी झोप मिळते आहे की नाही यावरही लक्ष ठेवले जाऊ शकेल. त्यासाठी चालकाला वेळ मिळण्याची दक्षता प्रवासी घेऊ शकतील.

शेवटी जीव महत्वाचा आहे याची जाणीव सर्वानींच सारखी ठेवणे गरजेचे आहे. तेव्हा, नियमभंगावर कठोर कारवाई, कायद्याची कठोर अंमलबजावणी यावर यंत्रणेला भर द्यावाच लागेल. बरोबरीने लोकांची मानसिकता बदलासाठी निरंतर प्रयत्नशीलताही आवश्यक आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...