Tuesday, January 6, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : २४ नोव्हेंबर २०२५ – उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा

संपादकीय : २४ नोव्हेंबर २०२५ – उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा

विविध संस्थांनी दिलेले दोन इशारे सामान्यजणांनी गंभीरपणे घ्यावे असेच ठरू शकतील. हे इशारे सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित आहेत. पहिला इशारा हवामानाशी संबंधित आहे. हवामानशास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे, की या वर्षाच्या अखेरीस ‘ला-नीना’ परिस्थिती येऊ शकते. ‘ला नीना’ (La Lina) ही पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी थंड करण्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतात सामान्यापेक्षा अधिक थंडी पडू शकते. भारतीय हवामान विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे, की ‘ला-नीना’ चा परिणाम भारतातील खंड हिवाळ्याशी संबंधित असतो. परिणामी, यावर्षी भारतात कडक हिवाळा येऊ शकतो. दुसरा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिला आहे.

भारतात विषाणूचा (व्हायरल) प्रसार वेगाने वाहत आहे. संस्थेच्या अभ्यासात विविध आजार पसरवणारे विविध विषाणू आढळल्याचे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृतांत म्हटले आहे. प्रत्येकी नऊ व्यक्तींमागे एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या विषाणूच्या संसगनि त्रस्त आहे असा निष्कर्ष त्यात नमूद आहे. लहान मुले, वयस्कर व्यक्ती, कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्ती यांच्याचाबतीत संसर्ग गंभीर उरू शकतो असे संस्थेने म्हटले आहे. खूप कडाक्याची थंडी जाणवायला लागली आहे. तीव्र हिवाळ्यात आणि प्रदूषित हवेमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते असे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी अशा किरकोळ पण अशक्तपणा आणू शकतील अशा तक्रारी लोक करतात. हीच परिस्थिती उपरोक्त विषाणूंच्या वाडीला आणि फैलावाला पोषक ठरू शकेल. शिवाय, पावसाळ्यात अनेक ठिकाणचे जलस्रोत प्रदूषित झालेले असतात. खराब पाणी पिण्यात येऊ शकते. ते देखील अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. तेव्हा, आजारी पडून काळजी घेण्यापेक्षा तसे न होण्यासाठी दक्षता घेतलेली बरी हा दोन्ही इशाऱ्यांबाबत आरोग्याचा कानमंत्र ठरू शकेल, आयसीएमआरचे तज्ज्ञ देखील तेच सुचवतात. वारंवार हात धुणे, मास्क लावणे, स्वच्छ पाणी पिणे, सोशल डिस्टन्सिंग, आवश्यकता नसेल तर गर्दीची ठिकाणे टाळणे, पाण्याची भांडी स्वच्छ करणे, घराजवळ किंवा परिसरात पाणी साचू न देणे, घरचे गरम आणि सकस अन्न खाणे आणि पुरेशी झोप घेणे हे ते कानमंत्र आहेत. जे नागरिकांना नवीन नाहीत. याच सवयींच्या बळावर करोना साथीच्या सर्व लाटांचा सामान्य लोकांनी यशस्वी सामना केला आहे.

- Advertisement -

करोना (Corona) साथीच्या सर्व लाटांमध्ये लोकांनी त्या सवयींचा कठोर अवलंब केला. त्याशिवाय करोनाला परतवणे शक्य झाले नसते, पण आता त्याच छोट्या छोट्या पण अंमलात आणायला सहज शक्य सवयींचा लोकांना विसर पडला आहे. करोना काळात आलेले सामाजिक शहाणपण ओसरले आहे. पण तीव्र हिवाळ्याच्या आणि ऋतूबदलाच्या या काळात त्याच सवयी अनारोग्य टाळू शकतील असे तज्ज्ञ म्हणतात. वास्तविक, या सवयी कायमच्या अंगी बाणवल्यातर अनेकार्थानी ते फायद्याचे ठरू शकेल. डेंग्यू, इन्फ्लुएंझा, डायरिया, सर्दी-ताप खोकला अशा अनेक साथीच्या रोगांना आपोआपच अटकाव होऊ शकेल. थंडीत ध्यावयाची काळजी त्याला पूरक ठरू शकेल. थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा वापर, गरम भोजन, सूर्यप्रकाशात थाचणे, थोडासा तरी व्यायाम करणे, त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे अशी काळजी लोक घेऊ शकतील. या मार्गदर्शक सूचना अंमलात आणणे अजिबात कठीण नाही. उलट आरोग्य राखण्यासाठी ते सर्वाथनि फायद्याचे आहे. सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व लोकांना करोनाने पटवून दिले आहे. साथीचे आजार पसरू नये यासाठी काम करणे हे शासनाचे कर्तव्य आहे हे खरे. पण लोकांनीदेखील त्यांच्या सवयीमध्ये छोटे छोटे बदल केले तर साथीच्या विषाणूंच्या प्रसाराला पोषक वातावरण निर्माण होणार नाही. आजारी पडल्यावर लोक काळजी घेतात. डॉक्टर सांगतील तसे त्यांचे वर्तन असते. तीच काळजी आधी घेतली तर.. हाच विचार सर्वांनी प्राधान्याने करावा असाच उपरोक्त दोन्ही इशाऱ्यांचा सांगावा आहे. सामाजिक जागरूकतेची साथ शासकीय उपाय प्रभावी ठरवू शकते. जे अंतिमतः लोकांच्याच हिताचे ठरते. तेव्हा, वाढती थंडी आणि विषाणूंचा प्रसार रोखण्याचे सामाजिक भान लोक दाखवतील अशी अपेक्षा. कारण उपचारापेक्षा काळजी तरी नाही का?

YouTube video player

ताज्या बातम्या