Friday, January 23, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : २६ नोव्हेंबर २०२५ - आणखी एक 'मानाचा तुरा'!

संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२५ – आणखी एक ‘मानाचा तुरा’!

भारताच्या (Team India) शिरपेचात पुन्हा एकदा ‘विश्वचषकाचा तुरा’ भारताच्या लेकींनी खोवला. भारताच्या अंध महिलांच्या क्रिकेट संघाने पहिला ‘टी-२०’ विश्वचषक भारताला मिळवून दिला. साखळी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने एकही पराभव पत्करला नाही. महाराष्ट्राच्या (Maharashtra) गंगा कदमने संघाचे उपकर्णधारपद भूषवले. महिला संघाची ही पहिलीच स्पर्धा होती. हा विजय साजरा करताना मैदानावर तोच जल्लोष होता, तोच भावनांचा पूर वाहिला, जो काही दिवसांपूर्वी महिला क्रिकेट संघाने आणि देशाने अनुभवला होता. दृष्टिहीनतेच्या प्रमाणानुसार ही संघ बांधला जातो. कठोर परिश्रम, जिद्द, संघभावना आणि दृढनिश्चय हे झाले या विजयाचे सामान्य वर्णन ! कारण दिसत नसताना केवळ आवाजाचा अंदाज घेऊन खेळाचे तंत्रज्ञान त्या शिकल्या, पण हा विजय त्याही पलीकडचा आहे. तो शारीरिक उणिवांवर मात करणाच्या आंतरिक उर्मीचा, अंतः प्रेरणेचा आणि विपरीत परिस्थितीवर विजय मिळवण्याचादेखील आहे.

मुलगी अंध असूनही तिला भरारी घेण्यासाठी आकाश मोकळे करून देणान्या पालकांचाही आहे. या संघातील खेळाडूंच्या कहाण्या प्रेरणादायी आहेत. गंगा कदम हिचे वडील सालगडी म्हणून दुसन्याच्या शेतात राबतात, कर्णधार दीपिकाचे वडील शेती करतात. दीपिका जन्मतः अंध नव्हती. एका अपघातात तिची दृष्टी गेली. ओडिशाची फुला सरेन हिचा प्रवासही तिच्यासारखाच ! पाच वर्षांची असताना तिच्या डच्या डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर काही काळात तिच्या आईचीही दृष्टी गेली. एकदा हे रंगीबेरंगी जग पाहिल्यानंतर आलेले दृष्टिहीनत्व सहन करणे आणि त्यावर मात करणे हे सोपे काम नाही. जम्मू-काश्मीरची अनिका देवी ही जन्मतःच काही प्रमाणात अंघ आहे. त्यांचे खेळणे विलक्षण आहे. एरवी युवांच्या आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाने समाज अस्वस्थ आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातील निष्कर्षानुसार आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त युवकांचे प्रमाणही वाढत आहे. याशिवाय सगळ्या प्रकारची अनुकूलता असूनही समाजात रडतराऊ आढळतात, अशी माणसे सदोदित त्यांच्या उणिवांचे भांडवल करतात. त्यांच्या अपयशाचा दोष परिस्थितीवर ढकलतात किंवा कौटुंबिक उणिवांना देतात.

- Advertisement -

सरयोपट जगणे पसंत करतात. अर्थात हा काही प्रमाणात मानवी अवगुणदेखील मानला जातो, पण ज्यांना कोणताही शारीरिक अथवा मानसिक त्रास नाही ते मोबाईलवर (Mobile) वेळ वाया घालवतात, परिस्थितीला दोष देणे अंध खेळाडूंनाही शक्य होते. त्यांच्या त्या भावना समाजाने सहज स्वीकारल्याही असत्या, पण त्यांनी तसे केलेले नाही. पॅरालिंपिक दिव्यांग खेळाडूंचा प्रवासही असाच थक्क करणारा आहे. अपघातात दोन्ही पाय गमावलेली अवनी लेखत भारताची सुवर्णपदक विजेती नेमबाज आहे. धावपटू प्रीती पाल सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहे. दोन्ही हात नाहीत; तरीही पायांनी अचूक नेमबाजी करणारी शीतलदेवी असा पराक्रम करणारी जगातील एकमेव खेळाडू आहे. अशा कहाण्या सांगाव्यात तरी किती? या सगळ्यांनी परिस्थितीला शरण जाणे नाकारले, कविवर्य विंदा करंदीकर यांची ‘असे जगावे दुनिवेमध्ये, आव्हानांचे लेऊन अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आव्हानांना द्यावे उत्तर’ ही कविता त्यांनी शब्दशः जगून दाखवली. कारण त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय गवसले आहे. आज त्या क्रिकेट खेळतात, पण त्यांनी उरवले तर त्या कोणत्याही क्षेत्रात स्वतःला सिद्ध करतील, कारण ती वृत्ती त्यांनी मनात बिबवली आहे.

YouTube video player

परिस्थिती कशीही असली, उणीवा कितीही असल्या तरी सकारात्मक वृत्तीने त्यावर विजय मिळवता येतो, हेच यांनी दाखवून दिले आहे. समाजासमोर आदर्श उभा केला आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नकाफ हा स्वामी विवेकानंदांचा उपदेश त्यांनी आचरणात आणला आहे, यांच्याकडून समाज हेच शिकू शकेल. त्यांच्या पालकांचेही अभिनंदन! मुलींची सामाजिक सुरक्षितता हा पालकांच्या चिंतेचा विषय आहे. काम‌काजासाठी सकाळी घराबाहेर पडलेल्या मुलीच्या बाबतीत काही अनावस्था प्रसंग तर ओढवणार नाही ना? या चिंतेत पालक असतात. क्रिकेट खेळाडू तर अंध आहेत. त्यांच्या पालकांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटणे स्वाभाविकच ! त्यापोटी मुलींच्या जगण्यावर आणि खेळण्यावर ते मर्यादा घालू शकले असते, पण त्यांनी मुलींना संधी दिली. जगणे सुंदर करणान्या या सगळ्या खेळाडूंच्या पैर्यशील मनोवृत्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच !

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...