Friday, October 4, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 7 जानेवारी 2024 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 7 जानेवारी 2024 Today’s Horoscope

मेष –

आजचा दिवस अशुभ स्वरूपाचा आहे. भांडण-तंटे, वाद-विवादाचे प्रसंग येतील. मानसिक अस्थैर्य आणि चंचलता वाढेल. जोडीदारामध्ये काही बाबींवर वादविवाद होण्याची शक्यता आहे. सायंकाळनंतर स्वभावात लहरी आणि हट्टीपणा वाढेल. प्रकृती अस्थिर राहील. काळजी वाढेल. पीडादायक दिनमान राहील. स्वत:वर नियंत्रण ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.

- Advertisement -

वृषभ –

आजचा दिवस पराक्रम, स्वत:ला सिद्ध कराल. दिनमान उत्तम स्वरूपाचे आहे. चौकस बुद्धी, आकलनशक्ती, विवरण पद्धतीचा आपल्या कामात प्रभावीपणे वापर कराल. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. वैवाहिक सुखात वाढ होईल. आत्मविश्वासही बळावलेला असेल.

मिथुन –

आज आनंदी व उत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. खूप दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. आनंदाची शुभ बातमी ऐकायला मिळेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींच्या वाणीचा प्रभाव वाढेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. अभ्यासू आणि व्यासंगी मनोवृत्तीत वाढ होईल. संततीकडून समाधान लाभेल. नोकरी/व्यापार दोन्ही वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या. प्रतिष्ठा वाढविणारे योग आहेत. नवीन घर, वाहन खरेदीसाठी चांगला दिवस आहे. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील.

कर्क –

आजचा दिवस लाभदायक आहे. परंतु संमिश्र स्वरुपाची फळं मिळतील. भ्रमण व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. समृद्धीचा दिवस आहे. सर्व काही मनाजोग जुळून येईल. प्रगतीकारक आणी यशदायक दिनमान राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचा मार्ग सापडतील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. व्यापारी वर्गासाठी उत्पन्नात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. प्रकृतीच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस पीडादायक आहे. जुने आजार उद्भवतील. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह –

अशुभ दिनमान राहील. राग आणी उद्रेक निर्माण होईल. मानसिक बेचैनी, अस्वस्थपणा वाढेल. वरिष्ठांकडून मनस्ताप सहन करावा लागणार आहे. चिंताग्रस्त दिनमान असेल. आर्थिक हानी अथवा खर्च वाढेल. आपली मनस्थिती एकंदरीत अस्वस्थ असण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. मित्र-मैत्रिणींबरोबर तसेच जोडीदाराशी वादविवाद टाळा. आज नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कन्या –

आजचा दिवस आनंदी राहील. सर्वच बाबतीत वृद्धी करणारा दिवस आहे. उत्पन्नात वाढ होईल. शुभप्रद घटनाचा वर्षाव करणारा योग आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांत वाव मिळेल. सामाजिक बहुमान वाढेल. प्रवासातून लाभ होतील. व्यवसायिकांना नवीन व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आपल्या स्वभावातील चंचलता आणि टीकात्मक वृत्ती यावर फक्त संयम ठेवावा. शुभ फळ देणारा लाभदायक दिवस असून संधीचं सोन होईल.

तुला –

अत्यंत शुभ दिवस. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिष्ठा, पदप्राप्ती मिळेल. आपल्या स्वत:ला झोकून दया. कामाप्रती सजग राहा. यश निश्चितच लाभेल. सफलतादायक दिनमान आहे, नवनवीन योजना आमलात आणण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायिकांनी कर्जवसुलीसाठी ग्रहयोग अनुकुल असणार आहेत. नोकरवर जोडीदारासाठी देखील योग उत्तम आहेत. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. विदेश भ्रमणाची शक्यता आहे. एकंदरीतच प्रगतीकारक दिवस.

वृश्चिक –

आज आपल्या कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. सुखदायक दिवस आहे. आध्यात्मिक, देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य, धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील. भाग्याची साथ आपणास उत्तम मिळणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक, सौख्य देणारं असेल. उत्तम दिवस आहे.

धनु –

आजचा दिवस कष्टदायक आहे. चंद्राचे भ्रमण मृगशीर्ष पुनर्वसु नक्षत्रातून अष्टमातून होत आहे. अश्या स्थितीत आरोग्य, मानसिक स्वास्थ या दृष्टीने उद्याचा दिवस अशुभ राहील. मानसिक त्रास, अस्वस्थता वाढेल. परंतु आरोग्याच्या दृष्टीने त्रास निर्माण होतील. अपघात शस्त्रक्रिया, गंभीर स्वरूपाची दुखापत होण्याची शक्यता आहे. कलह उत्पन्न करणारा दिवस असून कष्टदायक योग आहेत. कुटुंबातील वातावरण बिघडेल. संततीबद्दल आरोग्याच्या तक्रारीची शक्यता आहे. मानसिक चंचलता, दडपण मनात भीती निर्माण होईल. काळजी घ्या.

मकर –

आजचा दिवस प्रसन्नतापूर्वक व्यतीत कराल. जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आणि कुटुंबाकडून सुख मिळेल. संततीच्या विद्याभासातील प्रगती समाधानकारक राहील. संपूर्ण दिनमान उत्तम आहे. शासकीय कामात यश येईल. महिलांना कलाकौशल्यातून प्रसिद्धी मिळेल. नोकरदारांना सहकार्य लाभेल. कोर्ट-कचेरीची कामे वडिलोपार्जित प्रॉपटाची कामे वास्तु विषयाची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. आपल्या कलागुणांना इतराकडून उत्तम प्रोत्साहन मिळेल. आर्थिकदृष्ट्या उत्तम योग आहे.

कुंभ –

अत्यंत उन्नतीकारक दिवस आहे. व्यवसायिकांनी सहकार्याकडून आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायातील बदल प्रगती घडविणारे ठरतील. नोकरदार वर्ग, कलाकारांना प्रसिद्धी बरोबर यश मिळवून देणारा योग आहे. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम राहाल. शुभसंकेत मिळण्याचा दिवस.

मीन –

आजचा दिवस मानसिक क्लेशदायक आहे. वादविवाद निर्माण करणारा दिवस. पुनर्वसु नक्षत्रातील चंद्र भ्रमणामुळे प्रेमप्रकरणात वादविवादाचे प्रकार घडतील. मित्र, भागीदारीतील आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण अडचणीत आणार आहेत. व्यवसायिकांना कर्ज प्रकरण त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी स्नेहपूर्वक वागा. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. संततीतीविषयी अशुभ घटना घडतील. मानसिक अस्वस्थता, भीती आपणास जाणवणार आहेत. तब्येतीची काळजी घ्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या