Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; पिकांचे नुकसान

Photo Gallery : वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; पिकांचे नुकसान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

 चांदवड(Chandvad ),येवला (Yeola )व नांदगाव( Nandgaon) तालुक्याला सोसाट्याचा वारा व वादळी वाऱ्याने झोडपून काढले.अवकाळी पावसाबरोबरच अनेक भागात गारांचा पाऊस पडल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथील नरहरी वाघ व सूर्यभान वाघ यांच्या तब्बल 30 एकर क्षेत्रावरील कांद्याचे गारांचा पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

चांदवड तालुका व नांदगाव तालुक्यात सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात झाली.या पावसाबरोबरच गारांचा पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला. या गारामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेला गहू, हरभऱ्यालाही मोठा फटका बसला आहे.

चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथील नरहरी वाघ व सूर्यभान वाघ यांचा कांदा आठ दिवसात काढणीस आलेला होता. मात्र,गारांचा पाऊस पडल्याने या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतमालातील उभ्या कांद्याला मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या कांद्याचे पावसाने नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चांदवड तालुक्यातील पन्हाळे बरोबरच रायपूर, निंबाळे अशा विविध भागांमध्ये गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मनमाड परिसरात तसेच येवला तालुक्यातही काही गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या