धुळे – प्रतिनिधी dhule
शिंदखेडा तालुक्यातील (Shindkheda Taluka) कलमाडी येथे शेतकऱ्याने (farmer) विष प्राशन करीत आत्महत्या (suicide) केली आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्जाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याबाबत पोलिसात (police) अकस्मात मृत्यूची करण्यात आले आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ध्येय वेडे ग्रामसेवक करत आहेत दिवस रात्र सायकलने प्रवास
शामकांत विनायक पाटील (वय 45 रा. कलमाडी ता.शिंदखेडा) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्यांनी खरीप हंगामात कपाशी लागवडी केली होती. पिकांची वाढही चांगली होती. परंतू सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता कर्ज कसे फेडावे, अशा विवंचनेतून ते होते. त्यातून त्यांनी काल दि.20 रोजी पहाटे राहत्या घराच्या ओट्यावर विषप्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.