Friday, September 20, 2024
Homeनाशिकद्राक्षबागेचे नुकसान

द्राक्षबागेचे नुकसान

खडकमाळेगाव। वार्ताहर Khadakmalegaon

- Advertisement -

देवरगांव (ता.चांदवड) येथील शेतकरी एकनाथ गयाजी कुरणे यांच्या नवीन द्राक्षबागेची अज्ञाताकडून 250 ते 300 झाडे कापुन टाकत सुमारे 11 लाईनचे अँगल वाकविले, याबाबत वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍याची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय संचालक मंडळाने गुरुवार (दि.15) प्रत्यक्ष द्राक्षबागेत जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍याचे म्हणणे ऐकून घेत शेतकर्‍याला धीर दिला. तसेच द्राक्षबागायतदार संघाच्या वतीने अशा स्वरुपात द्राक्ष बागायतदारांचे नुकसान करण्याच्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून कठोर कारवाई केली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले जाणार आहे. द्राक्ष बागायतदारांनी सजग राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांचेसह शेतकर्‍यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या