Friday, November 22, 2024
Homeनाशिकसुरगाण्यात पावसामुळे घरांची पडझड

सुरगाण्यात पावसामुळे घरांची पडझड

नदी-नाल्यांना पूर; पिकांचे नुकसान

- Advertisement -

बोरगाव । वार्ताहर Borgaon

सुरगाणा तालुक्यात आठवडाभर संततधार सुरु असल्याने नार, पार, वाझडी, तान, मान, अंबिका, कावेरी या नद्यांना महापूर आले आहेत. काही ठिकाणी नदीच्या काठावर असलेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून भिंती कोसळून अतोनात नुकसान झाले आहे.

पावसामुळे गोगूळ येथील अर्जुन घुले यांचे घराची भिंत पडून सिमेंट पत्रांचे नुकसान झाले आहे. बोरचोंड येथील अनिल नरेश कनसे, पिळुकपाडा येथील खंडू चंदर वाघमारे, अंबोडे येथील वसंत नारायण भोये, करंजूल (क) येथील रवींद्र चौधरी, भिंतघरपैकी चावडीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले आहे.

बुबळी येथील यशवंत सोमा गुंबाडे, निंबारपाडा खोकरी येथील नारायण राऊत, मनखेड येथील भास्कर ब्राह्मणे, कुकूडमुंडा येथील रखमाबाई गोतुर्णे, हिरडपाडा येथील सोमनाथ गवळी, चिंचले येथील चंदू पालवा, हतगड येथील पारीबाई कवर, सुरगाणा शहरातील देविदास भोये यांच्या घराची भिंत पडली आहे. यात काहींच्या राहत्या घरांची पडवी, घराच्या भिंती कोसळून अतोनात नुकसान झाले आहे.

संबंधित तलाठींना तहसीलदार रामजी राठोड यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या