Friday, May 3, 2024
Homeनाशिकसाबळबारीच्या दमयंतीने फुलविला सुगंधी अगरबत्तीचा उद्योग

साबळबारीच्या दमयंतीने फुलविला सुगंधी अगरबत्तीचा उद्योग

नाशिक | मोहन कानकाटे

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या हरसूल भागातील (Harsul Area) ठाणापाडा (Thanapada)गावाच्या परिसरात साबळबारी या छोटया आदिवासी वस्तीत सुगंधी अगरबत्तीचा उद्योग (Agarbatti industry) फुलवून एका महिलेने साबळबारीचा सुगंध गावागावात पसरविण्यास सुरवात केली आहे…

- Advertisement -

या गावाची लोकसंख्या (Population) अवघी दोनशे असून साधारणता ३० ते ३५ घरे आहेत. गावातील घरे ही कौलारु आणि बाबूंची असून येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा पारंपारीक शेतीचाच आहे. आजपर्यंत या गावात उद्योगाची कास कोणी धरलीच नव्हती. पंरतु आता शेतीबरोबरच साबळबारी (Sablabari) गावात दमयंती अंबादास राऊत (Damayanti Ambadas Raut) या महिलेने स्वतच्या मुलीच्या नावाने राजेश्वरी अगरबत्ती नावाचा घरगुती अगरबत्तीचा व्यवसाय सुरु केला आहे.

काही वर्षांपूर्वी गावात रोजगार (Employment) नसल्याने दमयंती राऊत आणि पती अंबादास राऊत हे औरंगाबाद येथे एका कंपनीत कामाला लागले.पंरतु करोनामुळे (Corona) ही कंपनी बंद पडली. त्यामुळे त्यांनी पुन्हा गावाकडे येऊन काहीतरी व्यवसाय करायचे ठरविले. त्यानंतर राऊत दाम्पत्याने नाशिक येथील अर्जुन इंडस्ट्री या कंपनीशी संपर्क साधून अगरबत्ती व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला हा व्यवसाय सुरु करतांना त्यांना पैशांची अडचण आली. यानंतर विविध बँकांकडून कर्ज (Loan) घेत व्यवसायाची उभारणी केली.

राऊत यांनी अगोदर अर्जुन इंडस्ट्री या कंपनीला कच्चा माल बनवून पाठविला. त्यानंतर अगरबत्तीचे उत्पादन केले. अगरबत्ती तयार करण्यासाठी राऊत दाम्पत्याने मशिन खरेदी केले. व तेव्हापासूनच घरगुती अगरबत्तीच्या व्यवसायाला सुरुवात केली. आतापर्यंत राऊत यांनी ४० ते ४५ प्रकारच्या अगरबत्ती तयार केल्या असून यात चिमण्या, मोगरा, गुलाब, लोधन, यासारख्या अगरबत्तींचा समावेश आहे. तसेच या सर्व अगरबत्ती गुजरात (Gujrat)हरसूल (Harsul) करंजाळी (Karanjali) या भागात विक्रीसाठी नेल्या जातात.

अशी तयार केली जाते अगरबत्ती

एका मशीनमध्ये सुरुवातीला दोन किलो पावडर टाकली जाते. त्यासाठी १४०० ग्रॅम पाणी घेतले जाते. त्या पाण्यामध्ये ८० बर्निंग पावडर टाकून त्याचे मिश्रण तयार करून एका भांड्यात टाकले जाते. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला सेन्सरवर अगरबत्तीची काडी ठेऊन ती काडी पुढे सरकून अगरबत्ती तयार केली जाते. तसेच अगरबत्ती तयार झाल्यानंतर मशिन नसल्यामुळे ते सुकण्यासाठी तारेवर टाकले जाते. त्यानंतर बजारात विक्रीसाठी आणली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या