Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Police News : दामिनींनी दिला ५०० टवाळखोरांना चोप; पथकाची महिनाभरात कारवाई

Nashik Police News : दामिनींनी दिला ५०० टवाळखोरांना चोप; पथकाची महिनाभरात कारवाई

निर्भयाने शोधले २५ बेपत्ता तरुण-तरुणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील पोलीस ठाणेनिहाय नेमलेल्या दामिनी मार्शल्सनी महिन्याभरात पाचशे टवाळखोरांना (Miscreants) चांगलाच चोप दिला आहे. तर, निर्भया पथकांनी महिन्याभरात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या पंचवीस जणांना शोध पूर्ण केला. विनाकारण उद्यानात, रस्त्यालगत बसणारे, तरुणींची छेड काढणारे, हुल्लडबाजी करणाऱ्यांना महिला पोलिसांनी खडेबोले सुनावत प्रसंगी चोपही दिला आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिक शहर पोलिस (Nashik City Police) आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांत कार्यरत दामिनी मार्शल्सकडे आता फोन करून मदत मागणे शक्य आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालयाने चार विभागांनुसार एप्रिल अखेरीस स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक जारी केले. यासह ३८ महिला अंमलदारांची नियुक्ती करुन महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आदेश आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. उपायुक्त मोनिका राऊत यांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे या सर्व पथकांचे नेतृत्व करीत आहे.

दरम्यान, या पथकांमार्फत समाजात होणाऱ्या अत्याचार व शोषणाबाबत नव्याने सुरु केलेल्या कारवाईबाबत प्रबोधन करण्यात आले. नंदा तानाजी सलगर (वय ६५) यांचा छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील मंजुळा पॅलेसजवळ शोध घेत नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. यासह लोकसभा निवडणुकीचे कर्तव्य सांभाळात ‘स्ट्रिट क्राइम’ नियंत्रणासाठी महिला पोलिसांनी धडक कामगिरी केली आहे.

दामिनी पथक – टवाळखोर –   स्टॉप अँड सर्च –   शाळा-कॉलेज भेट

  पंचवटी      –    १७७        –      १९            –        ४

सरकारवाडा   –      ६६        –     १७           –          ३

अंबड          –     ५२        –    २१              –        ६

नाशिकरोड    –  १८४         –    १६               –      ५

निर्भया पथक मिसिंग शोधले

पंचवटी       –     ८

सरकारवाडा  –    १

अंबड         –     १

नाशिकरोड  –    १५

- Advertisment -

ताज्या बातम्या