Tuesday, March 25, 2025
HomeनगरGautami Patil : गौतमी पाटीलला दिलासा! अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी...

Gautami Patil : गौतमी पाटीलला दिलासा! अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?

अहमदनगर । Ahmednagar

प्रसिद्ध रिलस्टार आणि डान्सर गौतमी पाटील (Gautami patil) नेहमीच चर्चेत असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिचे कुठेच चर्चाच नव्हती. ना लावणीचे शोमध्ये दिसली, ना कुठल्या राड्यात.

- Advertisement -

मात्र गौतमी पाटील आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी गौतमी पाटील कोणत्या कार्यक्रमात नाही तर चेहऱ्याला स्कार्फ आणि अतिशय साध्या ड्रेसमध्ये न्यायालयात दिसली. रंगीत साड्या घालून कार्यक्रम गाजवणारी गौतमी पाटील अहमदनगरच्या न्यायालयात दिसली आणि न्यायालयाने तिची बाजू एकून घेत तिला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गौतमी पाटीलला दिलासा मिळाला आहे. पण यामागचं नेमकं कारण काय? ते जाणून घेऊयात. (Gautami Patil Latest News)

हे हि वाचा : आ. अमोल मिटकरींवर कोपरगावात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Gautami Patil Programe) या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटील हिला आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलं.

अर्थात न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयात हजर राहणं अनिवार्य आहे. अन्यथा कोर्टाकडून वॉरंटदेखील निघू शकतं. पण तसं काही घडलं नाही. त्याआधीच गौतमी आज न्यायालयात हजर झाली. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला. त्यामुळे गौतमीला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे हि वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तरुणांकडून हुल्लडबाजी होण्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेलं बघायला मिळालं होतं. एकदा तर तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली की काही जण जिल्हा परिषद शाळेच्या कौलांवर जावून कार्यक्रम पाहत होते. यावेळी एक जण कौलावरुन थेट जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...