Sunday, May 26, 2024
Homeनगरदारणाने गाठली पासष्टी तर भावलीने सत्तरी

दारणाने गाठली पासष्टी तर भावलीने सत्तरी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर मध्यमस्वरुपाचे पावसाचे आगमन होत होते. इतरत्र मात्र अधून मधून बुरबूर स्वरुपाचा पाऊस पडत आहे. काल दारणा 65.37 टक्के तर भावली 70.29 टक्के भरले. घाटमाथ्यावरील पावसाने काल दारणात 24 तासात 116 दलघफू नविन पाणी दाखल झाले. मुकणे 52.84 टक्के भरले आहे. गंगापूरमध्ये दीड महिन्यात अवघे 636 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. गंगापूरात 42.45 टक्के पाणीसाठा आहे.

- Advertisement -

काल घाटमाथ्यावर पावसाचे रिपरिप सुरू होती. घाटमाथ्यावरील धबधब्यांनी जलाशयात पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 7 मिमी, पाणलोटातील इगतपूरी येथे 36 मिमी, भावलीला 51 मिमी, भामला 45 मिमी, असा पाउसा नोंदला गेला. घोटी परिसरातही इगतपूरी इतका पाऊस दररोज पडतो. काल सकाळी दारणा 65.37 टक्क्यांवर पोहचले होते. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 4637 दलघफू पाणीसाठा आहे. भावलीत 70.29 टक्के पाणीसाठा आहे. दिड टिएमसीच्या भावलीत 1 टिएमसी पाणीसाठा झाला आहे. मुकणेत 52.84 टक्के, वाकीत 12.52 टक्के, भाममध्ये 37.22 टक्के, वालदेवीत 23.04 टक्के असा पाणीसाठा आहे.

गंगापूरच्या पाणलोटात मात्र पावसाचे प्रमाण सुरुवातीपासुनच कमी आहे. 1 जून पासुन कालपर्यंत गंगापूर च्या भिंतीजवळ 357 मिमी पावसाची एकूण नोंद झाली. काल या भिंतीजवळ 15 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोटातील त्र्यंबक येथे 9 मिमी, अंबोली येथ्ज्ञे 30 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 2390 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण 42.45 टक्के इतके भरले आहे. कश्यपी 23.54 टक्के, गौतमी गोदावरी 18.58 टक्के, कडवा 29.51 टक्के, आळंदी 7.60 टक्के असे पाणीसाठे धरणात आहे. गतवर्षी नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये कालच्या तारखेला 76.87 टक्के पाणीसाठा होता. काल 39.06 टक्के पाणीसाठा आहे. धरणांच्या पाणलोटाला तसेच लाभक्षेत्राला मुसळधार पावसाची गरज आहे. जायकवाडीतही समाधानकारक पाणीसाठा नाही.

नाशिक, नगरच्या धरणसाठ्यावर, पावसावर जायकवाडीचे लक्ष आहे. तीन आठवड्यात जायकवाडीत अवघ्या एक टिएमसी पाण्याची वाढ झाली आहे. 26 टक्क्यांवरुन पाणी साठा 27 टक्के झाला. एकूण उपयुक्त 76 टिएमसी पाणी साठ्याच्या 65 टक्के म्हणजेच 49 टिएमसी पाणी साठा व्हायला हवा. आता तो केवळ 21 टिएमसी आहे. जायकवाडीला 28 टिएमसी पाण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या