Friday, November 22, 2024
Homeनगरदारणाच्या पाणलोटात पावसाचा जोर

दारणाच्या पाणलोटात पावसाचा जोर

दारणातील विसर्ग 5398 क्युसेक, गोदावरीतील विसर्ग 3559 क्युसेकवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने काल सकाळी 6 पर्यंत एकूण 3 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातील आवक वाढल्याने सकाळी 6 वाजता सुरू असलेला 2624 क्युसेक विसर्ग काल सायंकाळी 5398 क्युसेक करण्यात आला. आवक वाढल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत पडणारा विसर्गही 3559 क्युसेकवर नेण्यात आला.
मंगळवारी दिवसभर दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटीच्या घाटमाथ्यावर जोरदार पास सुरू होता. त्यामुळे दारणात पाण्याची आवक वाढल्याने काल सकाळी 2624 क्युसेकवर असणारा दारणातील विसर्ग 4 वाजता 1396 क्युसेकने वाढवून तो 4020 क्युसेकवर नेण्यात आला. नंतर दोन तासांनी 6 वाजता त्यात पुन्हा 1378 क्युसेकने वाढ करुन तो 3559 क्युसेकवर नेण्यात आला.

- Advertisement -

भावली 208 क्युसेकने सुरू होता. त्याच्या विसर्गातही वाढ झाली. कडवातून 400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दारणा, भावलीच्या पाणलोटात पावसाची जोरदार बॅटींग सुरू राहिली तर विसर्गात वाढ होऊ शकते. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातही वरील धरणातून आवक वाढत असल्याने काल सायंकाळी 6 वाजता गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येणारा विसर्ग 2759 क्युसेकवरून 3559 क्युसेक इतका करण्यात आला आहे. काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत 3042 दलघफू म्हणजेच 3 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

धरणांचे साठे असे – दारणा 84.26 टक्के, मुकणे 34.09 टक्के, वाकी 44.46 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 68.05 टक्के, गंगापूर 60.66 टक्के, कश्यपी 31.86 टक्के, गौतमी गोदावरी 59.10 टक्के, कडवा 86.02 टक्के, आळंदी 28.31 टक्के, नांदूरमधमेश्वर 100 टक्के असे साठे काल सकाळी 6 पर्यंत नोंदले गेले.
दारणा धरणसमुहातील काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांतील पाऊस असा- दारणा 10 मिमी, मुकणे 7 मिमी, वाकी 28 मिमी, भाम 17 मिमी, भावली 38 मिमी, वालदेवी 12 मिमी, कडवा 2 मिमी, घोटी 28 मिमी, इगतपुरी 40 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. गंगापूर धरण समुहातील पाऊस-गंगापूर 13 मिमी, कश्यपी 11 मिमी, गौतमी गोदावरी 15 मिमी, आळंदी 5 मिमी, नाशिक 5 मिमी, त्र्यंबक 14 मिमी, अंबोली 42 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या