Friday, May 3, 2024
Homeनगरदारणाच्या पाणलोटात मध्यम पाऊस

दारणाच्या पाणलोटात मध्यम पाऊस

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काल पहाटेपासून काही काळ मध्यम पावसाची हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. दारणात काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 34 दलघफू पाणी दाखल झाले. काल दिवसभर रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरू होता.

- Advertisement -

ढगाळ वातावरण परंतु पावसाचे म्हणावे असे आगमन होत नसल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत नाही. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी व काल गुरुवारी सकाळी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ अवघा 3, मुकणेला 3, वाकीला 9 , भाम 13, भावलीला 17 मिमी तर दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटीला 27 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबकला 15 मिमी, अंबोलीला 22 मिमी, तर गंगापूरच्या भिंतीजवळ 6 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपीला 19 , आळंदीला 16, गौतमी गोदावरी 7 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

या पावसाने दारणात 34 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. भाम ला 24 दलघफू पाण्याची आवक झाली. अन्यत्र नगण्य आहे. दारणातून आवर्तनासाठी पाणी सुुरु असल्याने दारणा 87.37 टक्क्यांवर आले आहे. दारणातून गोदावरीचे दोन्ही कालवे व एक्सप्रेस कालव्यांचे आवर्तन सुरु आहे. यासाठी 1400 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. गंगापूरचा साठा 91.30 टक्क्यांवर स्थिर आहे.

कुकडीत धिम्यागतीने पाण्याची आवक

कुकडी धरण समूह पाणलोटात पाऊस सुरू असलातरी जोर नसल्याने धरणांमध्ये अतिशय धिम्या गतीने पाण्याची आवक होत आहे. गत 24 तासांत अवघे 119 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. या समूहातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 21370 दलघफू (72 टक्के)झाला होता. माणिकडोह धरण पाणलोटात 10 मिमी पावसाची नोंद झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या