Saturday, May 4, 2024
Homeधुळेस्वर्ण पॅलेसमधील धाडसी चोरीचा लागला छडा ; जालनासह जळगावातून दोघांच्या मुसक्या आवळल्या

स्वर्ण पॅलेसमधील धाडसी चोरीचा लागला छडा ; जालनासह जळगावातून दोघांच्या मुसक्या आवळल्या

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफ दुकानातील धाडसी चोरीचा पीआय नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे पोलिसांनी जालना आणि जळगावातून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

तर मुख्य आरोपी फरार असून त्यालाही लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, अशी माहिती आज पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषछेत दिली. प्रसंगी त्यांनी आझादनगरचे पीआय नितीन देशमुख, एपीआय संदीप पाटील यांच्यासह पथकाचे विशेष कौतूक केले.

आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफ दुकानात दि.9 रोजी जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत तब्बल 89 लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी प्रकाश जोरावरमल चौधरी (रा.नित्यानंद नगर, नटराज टॉकीज जवळ, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर आझादनगर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सराफ दुकानातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच बाजारपेठेतील दुकानातून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे विश्‍लेषन केले. तसेच गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा गुन्हा किशोर टाक (रा.जालना) याने त्यांच्या साथीदारांसह केला असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकातील रवाना करून आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश केले. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी जालना शहरा गाठून किशोरसिंग रामसिंग टाक (वय 25 रा.गुरुगोविंद नगर, शिवाजीनगर जवळ, जालना) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने किशोरसिंग टाक याचा दुसरा साथीदार झेनसिंग ऊर्फ लकी जिबनसिंग जुन्नी (वय 28 रा. नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. दोघा आरोपींकडून 60 रुपयांची 1 किलो 20 ग्रॅम वजनाच्या चांदिच्या पट्टी स्वरूपात 5 लगड, 72 हजारांची 14.430 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या 3 लगड, 40 हजारांची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 72 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान आरोपी किशोरसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये तब्बल 31 घरफोडी जबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, पोहेकाँ योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदिप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, निलेश पाकड, पंकज जोंधळे, सिध्दार्थ मोरे, महिला पोलीस शिपाई पवार व पारेराव यांच्या पथकान केली.

मालाचे दोन हिस्से मुख्य आरोपीकडे- गुन्ह्यात फरार असलेला तिसर्‍या साथीदाराने धुळ्यातील स्वर्ण पॅलेसमधील चोरीचे नियोजन केले होते. त्यानुसार तो तीन दिवस धुळ्यात मुक्कामी होता. तेव्हा त्याने पाहणी करीत नियोजन केले. तसेच दि. 9 रोजी सकाळी पुन्हा स्वर्ण पॅलेस या दुकानाची पाहणी केली. त्यानंतर रात्री दोन साथीदारांना धुळ्यात बोलवले. पहाटे एक वाजता चोरीदरम्यान एक व्यक्ती आल्याने चोरी एक तास थांबविली होती. त्यानंतर पुन्हा चोरी केली. दरम्यान गुन्ह्यातील सर्व माल घेवून मुख्य आरोपी फरार असल्याची कबुली यावेळी एका आरोपीने दिली. दरम्यान तिसरा आरोपी निष्पन्न होणे बाकी असून गुन्ह्यातील मालाचे एकुण चार हिस्से करण्यात आले होते. त्यातील दोन हिस्से मुख्य आरोपीकडे असल्याचे हे दोन्ही आरोपी

- Advertisment -

ताज्या बातम्या