Sunday, May 4, 2025
Homeधुळेपिंपळनेर येथे धाडसी चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

पिंपळनेर येथे धाडसी चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

पिंपळनेर Pimpalner, । वार्ताहर

साक्री तालूक्यातील पिंपळनेर येथील गांधी चौकात भर दुपारी घराच्या दरवाज्याचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी (theft) तोडून साडेसात लाख रूपये रोख व दीड तोळ्याची सोन्याची पोत, तीन गॅ्रमचे कानातील डोंगल आणि चांदीचे जोडवे असा मुद्देमाल चोरून (stealing the material) नेला. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पिंपळनेर शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकात सुनिल शहा यांच्या घरात कुणाल अशोक कोतकर भाडेतत्वावर राहतात.त्यांची पत्नी ऋतुजा ही माहेरी गेल्या आहेत. कुणाल हे फोर व्हीलर गाड्यांचा व्यवसाय करतात.ते आज दुपारी 2 वाजता गाडी घेण्यासाठी धुळ्याला जाण्याआधी घरातील बॉक्स पलंगमध्ये चादरमध्ये साडेसात लाख रुपये ठेवून घराला कुलूप लावून निघाले. त्यानंतर त्यांच्या आईला त्यांनी फोन केला घरातील सफाई करून माझे कपडे धुण्यासाठी घेऊन जा, त्यासाठी त्यांची आई मंदाबाई या घराजवळ गेले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप उघडलेले दिसले. आतमध्ये जाऊन पाहिले असता दोघे गोदरेज कपाट व बॉक्स पलंग मधील साहित्य आस्थाव्यस्त पडलेले आढळून आले.

त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच कुणाल यास फोन करून सांगितले की घरात चोरी झाल्याची माहिती दिली. कुणाल हे नेर गावापासून परत घराकडे परत आले. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व पीएसआय प्रदीप सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चौकशी केली असता चोर हा सराईत असून तो मागच्या दाराकडून पसार झालेला असावा.

बॉक्स पलंगमध्ये चादरीच्या तिसर्‍या घडीमध्ये पिशवीमध्ये साडेसात लाख रुपये रोख व गोदरेज कपाटातून दीड तोळ्याची शॉर्टपोत, तीन ग्रॅमचे कानातील डोंगल व पायातील चांदीचे जोडवे चोरून नेल्याचे उघडकीस आले.

पिंपळनेर शहरातील गजबजलेल्या भर वस्तीतील मध्यभागी असलेल्या गांधी चौकातील घरातून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही धाडसी चोरी झाल्याने पिंपळनेर शहरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. काल रात्री सुशील चित्रमंदिर जवळील नवीन वसाहतीत अंबिका झेरॉक्सचे मालक चौधरी यांच्याही घरीही चोरी झाल्याचे समजते. पिंपळनेर शहरात पोलिसांनी दिवसा व रात्री ग्रस्त वाढवावी तसेच पिंपळनेर शहरातील व्यापार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. तरी चौका चौकात भर वस्तीत व्यापार्‍यांनी सीसीटी कॅमेरे बसवावे असे आवाहन एपीआय सचिन साळुंखे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये काविळचा दुसरा बळी

0
राजूर |वार्ताहर| Rajur अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळच्या साथीने रौद्र रूप घेतले असून दुसर्‍या रुग्णाचा बळी घेतला आहे. मिसबाह इलियास शेख (वय13) या मुलीचा मृत्यू...