Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्या'असे'आहे शिंदे गटाचे दसरा मेळाव्याचे पोस्टर

‘असे’आहे शिंदे गटाचे दसरा मेळाव्याचे पोस्टर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेनेचा दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना त्या अगोदरच शिंदे गटाकडून (Shinde Group) दसरा मेळाव्याचे (Dasara Melava) पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे…

या पोस्टरवर शिवसेना (Shivsena) आमचीच, आम्हीच बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार पुढे नेणारे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रस्तावित असताना शिंदे गटाच्या पोस्टवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह लावण्यात आले आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटांकडून सुद्धा दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. “काळ कसोटीचा आहे पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे, चलो शिवतीर्थ” असा मजकूर ठाकरे गटाच्या पोस्टरवर झळकत आहे.

दरम्यान, शिंदे गटाचा ५ ऑक्टोबरला बीकेसी मैदानावर (BKC ground) दसरा मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. तर ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या