Friday, May 8, 2026
Homeनगरजन्मतारखेत खाडाखोड करून सरकारची फसवणूक

जन्मतारखेत खाडाखोड करून सरकारची फसवणूक

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जन्मतारखेच्या नोंदीत तफावत आढळल्याने नेवासा पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दीपक भगवान कंगे यांनी कार्यालयीन गैरवर्तन केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करत जिल्हा सेवा तरतुदीनुसार समय श्रेणीतील निम्न स्तरावर बदली करण्यात आली असल्याचा आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढला आहे.

- Advertisement -

कंगे सध्या नेवासा पंचायत समितीमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी मुख्यालय, राहाता, श्रीरामपूर या ठिकाणी काम केलेले असून श्रीगोंदा येथे काम करत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कंगे कर्मचार्‍यांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या. परंतु वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव टाकून मिटवण्यात आल्या होत्या.

कंगे यांचा जन्म तारखेचा दाखला अहमदनगर महानगर पालिकेने दिलेला जन्म नोंदणीचा दाखला यात तफावत आढळली. कंगे यांची जन्मतारीख 1967 असताना ती 1970 करण्यात आली. यासंदर्भात त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळलेले आहेत.

कंगे हे वरिष्ठ सहाय्यक या पदावर सामान्य प्रशासन विभाग (अहमदनगर) येथे कार्यरत असताना जन्म तारखेमध्ये बदल करणेबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे अर्ज केला होता. कंगे यांनी पदाचा गैरवापर करून जन्मतारखेत बदल करण्याचा आदेश काढला.

याबाबत तक्रारी झाल्यानंतर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, संदीप कोईमकर, सुरेश शिंदे (प्रभारी) यांच्यावर दबाव टाकून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर हे कंगे यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आग्रही होते. विभागीय चौकशीमध्ये कंगे यांनी जन्मतारखेत केलेली तफावत सिद्ध झाली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश करून कंगे यांना निम्न स्तरावर आणणे बाबतचा आदेश काढला.

जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाते. कंगे यांनी जन्मतारखेत खाडाखोड करून सरकारची फसवणूक केली. हा गंभीर गुन्हा असल्याने फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.

कंगे यांनी कर्मचार्‍यांना फार त्रास दिलेला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी जन्मतारखेत बदल केला. परंतु चौकशीत आरोप सिद्ध झाले. सरकारची फसवणूक केली म्हणून कंगे विरुद्ध फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची इच्छा आहे.

– कृष्णा शिंदे (तक्रारदार) सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी, श्रीरामपूर

ताज्या बातम्या

महसूल विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे पाणंद रस्ते, सीमांकन मोजणी व जमीन नोंदी...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सीमांकन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे तसेच जमीन नोंदी व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागामार्फत...