Monday, April 28, 2025
Homeक्राईमडेटींग अ‍ॅपचा वापर करून अपहरण आणि लुटणारे जेरबंद

डेटींग अ‍ॅपचा वापर करून अपहरण आणि लुटणारे जेरबंद

नगरच्या बोल्हेगावचे तीन आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात

शिरूर |तालुका प्रतिनिधी| Shirur

डेटिंग अ‍ॅपचा वापर करून जाळ्यात अडकवून अपहरण करून लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या नगरच्या तीन सराईत गुन्हेगारांना पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींनी शिक्रापूर परिसरात तीन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. याबाबत सुशांत नागरे, मयुर गायकवाड (रा. गांधीनगर चौभे कॉलनी, बोल्हेगाव अहमदनगर), श्रेयस आंग्रे (रा. नागापूर) या तिघांना पोलीस पथकाने अटक केली आहे. याबाबत अशरफ धोंडफोडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

- Advertisement -

फिर्यादी हे तळेगाव ढमढेरे उभे असताना चारचाकी वाहनातील इसमांनी मुंबईला जाण्याचा पत्ता विचारण्याचे बहाण्याने फियार्दीजवळ गाडी थांबवून त्यांना जबरदस्तीने चारचाकीत बसविले. चारचाकी वाहनातील अनोळखी तीन इसमांनी फिर्यादीस मारहाण केली. आरोपी हे पाण्याची बाटली घेण्यासाठी उत्तरले असता, फिर्यादीने संधी फायदा घेवून गाडीतून उतरून पळून गेला होता. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सीसी टिव्ही फुटेज व कारचे वर्णन यावरून ही कार नगरच्या दिशेने गेल्याचे दिसले. त्यानंतर नगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली.

गुन्ह्यात पांढर्‍या रंगाच्या पोलो कारचा वापर करण्यात आला होता. याची माहिती घेतली असता ही कार नांगरे वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून नांगरे याला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याचे गायकवाड, आंग्रे या दोन साथीदार यांची नावे निष्पन्न झाली त्यांनाही ताब्यात घेण्यातआले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, आरोपी यांनी मोबाईलमधील ग्रीडर डेटींग अ‍ॅपचा वापर केला होता. सदर अ‍ॅपचे माध्यमातून अनोळखी व्यक्तीला संपर्कात आणले जाते. त्याचेकडून त्याचे लोकेशन घेवून त्या लोकेशनला पोहचून आरोपी समोरील व्यक्तीस सोबत घेतात, त्यानंतर त्या व्यक्तीचे विचीत्र फोटो घेवून त्यास भिती घालून वेळप्रसंगी मारहाण करून पैसे उकळण्यात येत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...