Friday, May 3, 2024
Homeनगरदत्तनगरचे अशोक लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

दत्तनगरचे अशोक लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील अशोक लोंढे हे शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामावरून आपल्या घरी परतत असताना

- Advertisement -

रात्रीच्या दरम्यान त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवत हल्ला केला. यात लोंढे व त्यांचे मित्र जखमी झाले. या दरम्यान लोंढे एका ठिकाणी लपले. बराचवेळ लोेंढे न सापडल्याने हल्लेखोर निघून गेले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

यशवंत बाबा चौकीच्या ठिकाणी अशोक लोंढे यांच्या एच. एफ.डिलक्स एम.एच. 17-9055 या गाडीला थांबवण्यासाठी गाडीच्या पाठीमागून डॅश मारून पाडण्यात आले व हल्लेखोरांनी चाकूचा व बंदुकीच्या धाक दाखवून पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोंढे यांनी चाकू डाव्या हाताने पकडून धरला व बंदुकीच्या धाक दाखवणार्‍याच्या अंगावर लोटून बाजुच्या खड्ड्यात उडी मारून घटनेच्या ठिकाणाहून पळ काढत एमआयडीसीकडे धावत सुटले व एका खड्ड्यात जिवाच्या आकांताने लपुन बसून दत्तनगर भागातील आपल्या मित्रांना दूरध्वनीवरून माहिती दिली. मात्र तोपर्यंत हल्लेखोर दत्तनगर गावाच्या दिशेने निघून गेले होते.

घटनास्थळी आलेल्या लोंढे यांचे मित्र अजय शिंदे, नितिन मकासरे, बिभीषण गायकवाड, दीपक जगताप यांनी लोंढे यांच्या डाव्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना दत्तनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लोंढे यांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर जखम झाली असून 7 ते 8 टाके पडले आहेत.

या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून दोन दिवसांत पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांना अटक केली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर व दत्तनगर ग्रामस्थांनी दिला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक दीपक चव्हाण, सरपंच सुनील शिरसाठ, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुगरवाल, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, आरपीआयचे संघटक संजय बोरगे, बहुजन समाज पक्षाचे सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, विलास साळवे, भीमशक्तीचे सुनील संसारे, मँक्स भालेरावसह अनेक सामाजिक व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गर्दी करीत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या