Friday, May 3, 2024
Homeनगरडाऊच खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ

डाऊच खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील डाऊच खुर्द येथे करोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण डाऊच खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली होती. पार्श्वभूमीवर डाऊच खुर्द येथे पुन्हा एकदा माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संजय गुरसळ यांनी केले आहे.

- Advertisement -

करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची महत्वाकांक्षी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविली जाणार आहे. करोनाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर शेवटच्या करोनाबधित रुग्णापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदार संघातील प्रत्येक कुटूंबाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.

नागरिकांनी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना सहकार्य करून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच संजय गुरसळ यांनी केले आहेत. या कामी आशा सेविका आव्हाड ताई, प्राथमिक शिक्षक जाधव, ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मदत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या