Tuesday, February 3, 2026
Homeनगरआ. जगतापांना कारणे दाखवा नोटीस देणार - अजित पवार

आ. जगतापांना कारणे दाखवा नोटीस देणार – अजित पवार

‘त्या’ वक्तव्याबद्दल व्यक्त केली नाराजी

मुंबई | Mumbai

करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना नगरचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप यांनी दीपावली खरेदी फक्त हिंदू व्यावसायिकांकडून करण्याच्या केलेल्या आवाहनाची गंभीर दखल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली व आ. जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना, मी मनकवडा नाही. हे सारे आ. संग्राम जगताप करतात की अन्य कोणी करतो, हे मला माहीत नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आवर्जून स्पष्ट केले.

- Advertisement -

करमाळा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंदुत्ववाद्यांच्या जनआक्रोश मोर्चात बोलताना आ. जगताप यांनी हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करा व दीपावलीचा नफा हिंदू व्यावसायिकांनाच मिळाला पाहिजे, असे भाष्य केले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवारांनी माध्यमांशी बोलताना आ. जगतापांविषयी नाराजी व्यक्त केली व त्यांना पक्षाद्वारे कारणे दाखवा नोटीस दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्यावर जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे जबाबदारीने वागले पाहिजे, बोलले पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.

YouTube video player

सर्वांना बरोबर घेऊन चालणारा आपला पक्ष आहे, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मध्यंतरी मी एका कार्यक्रमानिमित्ताने तेथे गेलो होतो. तेव्हा त्यांना समजून सांगितले. त्यावर सुधारणा करीन अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पण तसे दिसत नाही. त्यांची भूमिका व विचार पक्षाला मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...