Tuesday, February 3, 2026
HomeनगरSangamner : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वादग्रस्त पोस्ट

Sangamner : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वादग्रस्त पोस्ट

संगमनेर शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अशा परिस्थितीत संगमनेरातील शिवसेना शहरप्रमुखाने समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची तत्काळ पदावरुन हकालपट्टी देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख (शिंदे गट) दिनेश भीमाशंकर फटांगरे (रा. संगमनेर) याने समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वैशाली राऊत (रा. घुलेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार दिनेश फटांगरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player

पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इमरान खान हे करत आहे. दरम्यान, या प्रकाराने तणावाचे वातावरण निर्माण होवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलीस ठाण्याजवळ ठिय्या दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्काळ पदावरुन हकालपट्टी...
संगमनेर शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे याने समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्याची आमदार अमोल खताळ यांनी गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावरुन उत्तर नगर जिल्हाप्रुख कमलाकर कोते यांनी फटांगरे याची तत्काळ पदावरुन हकालपट्टी केली आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...