Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट हॅक; पाकिस्तान आणि तुर्कीय...

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट हॅक; पाकिस्तान आणि तुर्कीय देशाचा झेंडा असेलेली पोस्ट शेअर केल्याने खळबळ

मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट आज सकाळी हॅक करण्यात आले होते. हॅकर्सनी त्यांच्या अकाऊंटवर पाकिस्तान आणि तुर्कियेचे झेंडे असलेली पोस्ट शेअर केली. यामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सायबर सेलने लगेचच त्यांचे अकाऊंट रिकव्हर केले आहे.

भारत-पाकिस्तान संघादरम्यान आज आशिया चषक सामना होणार आहे. पहिल्या सामन्यावेळी भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. आज दुसरा सामना होत आहे. शिवसेना आणि भारत-पाकिस्तान सामना यांच्यात मोठा वाद आहे. नेमके याच दिवशी एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या अकाऊंटवर पाकिस्तान आणि तुर्किये देशाचा झेंडा असलेली एक पोस्टही शेअर झाली होती. ही माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच दोन्ही पोस्ट डिलीट करत अकाऊंट रिकव्हर करण्यात आले. मात्र राज्याच्या मोठ्या नेत्याचे अकाऊंट अशाप्रकारे हॅक करून त्यावर पाकिस्तान, तुर्किये देशांशी संबंधित पोस्ट शेअर केल्या गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

YouTube video player

एकनाथ शिंदे यांचे पूर्वीचे ट्विटर आताचे एक्सवरील अकाऊंट हॅक झाल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी लगेचच सायबर पोलिसांना माहिती दिली. शिंदेंचे अकाऊट सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ते पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचा तपास आता सायबर विभागाकडून करण्यात येत आहे. ज्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या गेल्या, त्याचे आयपी ॲड्रेस तपासले जात आहेत. तसेच एक्स अकाऊंट हॅक करण्यामागे कोणता हेतू होता? याचाही तपास केला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या