Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: "शेतकरी आपला मायबाप, त्यांची दिवाळी…"; एकनाथ शिंदेंचा शेतकऱ्यांना शब्द

Eknath Shinde: “शेतकरी आपला मायबाप, त्यांची दिवाळी…”; एकनाथ शिंदेंचा शेतकऱ्यांना शब्द

मुंबई | Mumbai
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

तामिळनाडू पंजाबपेक्षा मोठं पॅकेज दिले
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, आम्ही इतका मोठा पाऊस कधीही पाहिला नव्हता. आम्ही बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. जवळपास ६५ लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त आहे. अशा काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विरोधक शेतकऱ्यांना एवढे पॅकेज द्या, तेवढे पॅकेज द्या सांगत होते. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तामिळनाडू आणि पंजाबपेक्षा मोठे पॅकेज दिले आहे. आम्ही शेतकऱ्यांना अधिकाअधिक मदत देण्याचा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये
“शेतकऱ्यांना मदत देणे हे आमचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचे पाऊल उचलू नये. कारण शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवेय, शेतकऱ्याचे काय काय नुकसान झाले याचा वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन मदत झालेली आहे आणि मदत होईल. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या असे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्तीचे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मिळणार आहेत. परंतु मनरेगांमधून तीन लाख रुपये हेक्टरी एका जमिनीचं रेशो आहे. जमीन पूर्ववत करणे सोपं नाही. हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता आणि तो आपल्या सरकारने मिटवला आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

YouTube video player

शेतकरी आपला मायबाप आहे
सर्व निकष बाजूला ठेवत आम्ही शेतकरी केंद्रबिंदू ठेवला आहे. जे जे उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत. कितीही आर्थिक ओढाताण असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पिकांच्या नुकसानीसाठी आम्ही एनडीआरएफ व्यतिरिक्त अतिरिक्त १० हजार रुपयांची मदत करणार आहोत. अमित शाह आले तेव्हा त्यांना विनंती केली, केंद्राची मदत देखील झाली पाहिजे, असे सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या मागे केंद्र सरकार उभे राहिले. यावेळचे संकट बघत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीचे नुकसान झाले आहे त्यात मदतीचा हात सरकार देईलच, सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरु केली आणि आपणही केली. शेतकरी आपला मायबाप आहे, त्याचे अश्रू पुसण्याचे काम आपण करु. पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहू, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...