Friday, May 3, 2024
Homeजळगावडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे करोनाबाधित तरुणाचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे करोनाबाधित तरुणाचा मृत्यू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गणपती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या 39 वर्षीय कोरोना बाधित तरूणाचा मृत्यू आज सायंकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

- Advertisement -

दौलत नगरातील रहिवासी पंकज कृष्णा बाविस्कर यांना 1 मे रोजी गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यांचा दि.7 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

पंकज बाविस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले .आम्हालाही त्यांच्या निधनाचे प्रचंड दुःख आहे. पेशंट जेव्हा दाखल झाला त्यावेळेपासूनच क्रिटिकल होते, तशी कल्पना नातेवाईक यांना दिली होती. आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न केले . मात्र दुःखद घटना घडली .आम्ही देव नसून निश्चितच प्रत्येक पेशंटची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करीत असतो . आम्ही बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत .

तेजस जैन,गणपती हॉस्पिटल

दरम्यान, डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत हॉस्पिटलसमोर रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदेालन मागे घेण्यात आले. मात्र, डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली.

बहिणीचा आक्रोश मन हेलवणारा

भावाच्या मुत्यूमुळे त्यांची बहीण काजल बाविस्कर यांचा आक्रोश मन हेलवणारा होता. आम्ही 5 वाजता इंजेक्शन आणले मात्र, ते दिले गेले नव्हते, इंजेक्शन दिले असते तर असे म्हणत डॉक्टरांच्या चुकीमुळे भाऊ गेल्याचा आरोप त्यांनी केला.

महापौर,उपमहापौरांची भेट

महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत नातेवाईकांनी समजूत काढली. या सर्व प्रकाराची चौकशी होइृल, असे जयश्री महाजन यांनी सांगितले.

यावेळी डॉ. ललित पाटील यांनी सांगितले की,पंकज बाविस्कर हे 26 रोजी बाधित आल्यानंतर त्यांना सुरूवातीला इकराला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना 1 मे रोजी गणपती रुग्णालयात आण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी 88 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या