Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यादुर्दैवी घटना : बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

दुर्दैवी घटना : बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजविली असून एका आठ वर्षीय मुलगा घराच्या ओट्यावर दिवाळी निमित्त पणती लावत असतांना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला केला होता. त्याचा तपास वन विभाग करत असतानाच आज संध्याकाळी ७.३० च्या सुमारास निळवंडी येथे आठ वर्षीय मुलगा गुरु खंडू गवारी हा पणती लावण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेले.

घराच्या मागच्या बाजूला उसाचे क्षेत्र असून त्या उसामध्ये बिबट्याने त्या मुलाला नेले शोध घेतला असता मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ‌गेल्या एक वर्षात ही दुसरी घटना असून मागील घटनेतही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता त्यात त्यालाही जीव गमवावा लागला.

दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे हे घटनास्थळी दाखल होऊन मुलांचा बुद्धदेव सविचरणासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेचा पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दिंडोरी शहरासह निळवंडी, हातनोरे, वाघाड, जांबुटके, मडकीजांब परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या