Saturday, May 25, 2024
HomeनाशिकNashik News : विजेचा शॉक लागून मायलेकींचा जागीच मृत्यू

Nashik News : विजेचा शॉक लागून मायलेकींचा जागीच मृत्यू

ओझर | वार्ताहर | Ozar

येथील दत्तनगरमधील (Dattanagar) वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या आई आणि मुलीचा (Mother and daughter) हाय टेन्शन वायरचा शॉक (Shock) लागून जागीच मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार (दि. ६ ऑगस्ट) रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे…

- Advertisement -

Nashik Bribe News : लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्याकडे सापडले ‘इतके’ घबाड

याबाबत अधिक माहिती अशी की, मीना हनुमंत सोनवणे आणि आकांक्षा राहुल रणशूर असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. घरावरच्या गच्चीतील पेरू तोडत असताना हातातील रॉड हा हाय टेन्शन वायरला (High Tension Wire) लागल्याने मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.

काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

तर मयत आकांक्षा रणशूर हिचे पती राहुल रणशूर व त्यांच्या दोन बालकांना शॉक लागून ते लांब फेकले गेल्याने बालंबाल बचावले. यावेळी राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी (People) तात्काळ धाव घेतली. मात्र, गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने विजेचा प्रवाह संपूर्ण बंगल्यात उतरला होता.

Sinnar News : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी (Ozar Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह (Dead Body) शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवले आहेत. तसेच या घटनेचा पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik News : लाचखोर बहिरम यांना ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कोठडी

- Advertisment -

ताज्या बातम्या