Wednesday, April 2, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपोलीस भरती दरम्यान २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पोलीस भरती दरम्यान २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे । प्रतिनिधी Pune

पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याला तात्काळ ससूनरुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामधील शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

तुषार बबन भालके (वय २७, रा. कौठे बुद्रुक, ता. संगमनेर, जि.अ.नगर) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, असे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AI Centers of Excellence : महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य...

0
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता...