Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrasad Lad : मोठी बातमी! आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी

Prasad Lad : मोठी बातमी! आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई । Mumbai

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा आमदार लाड यांनी केला आहे. या धमकीविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

आमदार लाड यांच्या म्हणण्यानुसार, धमकी देणा-याने “2 हजार लोकांसह हल्ला करेन,” असे म्हटले आहे. त्याचबरोबर, या व्यक्तीने कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा केला, असे आमदार लाड यांनी सांगितले.

YouTube video player

लाड यांनी पोलिसांकडून धमकी देणा-याची चौकशी करून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...