लखनौ | Lucknow
उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमध्ये (Lucknow) शनिवारी मोठी दुर्घटना घडली आहे. लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात तीन मजली इमारत कोसळून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
जखमींना लोक बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राज किशोर (27), रुद्र यादव (24) आणि जागरुप सिंह (35), धीरज गुप्ता (48), पंकज तिवारी (40), अरुण सोनकर (28), राकेश लखनपाल (67) आणि जसप्रीत सिंह साहनी (41) अशी मृतांची नावं आहेत.
हे ही वाचा : लग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र केले
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेली इमारत शहीद पथापासून काही अंतरावर होती. या पथावरील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये असलेली इमारत शनिवारी सायंकाळी अचानकपणे कोसळली. या इमारतीच्या आजूबाजूला भरपूर पाणी साचले होते. त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीची देखभाल केली जात नव्हती. त्यामुळेच इमारत कोसळली असल्याचं म्हटलं जात आहे.
हे ही वाचा : लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून तरुणाला मारहाण
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. तसेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.