Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअ‍ॅ‍ॅडम फॅब्रिवर्कमध्ये डेडिकेटेड टेस्टिंग सेंटर सुरू

अ‍ॅ‍ॅडम फॅब्रिवर्कमध्ये डेडिकेटेड टेस्टिंग सेंटर सुरू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

अंबड औद्योगिक वसाहतीत सन १९८२ पासून सेवेत असलेल्या अ‍ॅ‍ॅडम फॅब्रिवर्क प्रा. लि. या कंपनीने नुकतेच अद्ययावत डेडिकेटेड टेस्टिंग सेंटर सुरू केले.नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉ.डी. एल.कराड, बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर विकास कुमार, कंपनीचे संस्थापक संचालक वामन वाघ व देविदास शिरोडे यांच्या हस्ते सेंटरचे उदघाटन करण्यात आले.

कांदिवली, मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेली ही कंपनी फार्मास्युटिकल आणि बायो-फार्मास्युटिकल उद्योगांसाठी कस्टमाईज प्रक्रिया सिस्टम सोल्यूशन्समध्ये विशेष काम करते. मुख्य उत्पादन श्रेणीमध्ये निर्जंतुकीकरण इंजेक्टेबल उत्पादनासाठी उपकरणे, मोबाइल स्किड्स, इंटिग्रेटेड स्किड्स, सुपर स्किड्स, मलम आणि क्रीम प्रक्रिया प्रणाली, लिक्विड ओरल प्रोसेसिंग सिस्टम्स यांचा समावेश आहे.

करोना महामारीच्या काळातब अ‍ॅ‍ॅडम फॅब्रिवर्कने औषधांच्या निर्मितीसाठी फार्मास्युटिकल कंपन्यांसोबत भागीदारी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगभरात अनेक देशांमध्ये या कंपनीचा ग्राहक वर्ग आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या