Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारशहाद्यात छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळयाचे आज लोकार्पण

शहाद्यात छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळयाचे आज लोकार्पण

शहादा Sahada । ता.प्र.-

शहराच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या (equestrian statue) लोकार्पण सोहळा (Dedication ceremony) शहरातील शिवतीर्थ येथे उद्या दि.1 मे महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) सायंकाळी 6 ते 10 या वेळेत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री (Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil) गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी (Tribal Development Minister Adv. K. C. Padvi) असतील. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन शिव स्मारक बहुउद्देशीय समिती व शिवप्रेमींतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी खा.डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, आ.सुधीर तांबे, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.अनिल पाटील, आ.जयकुमार रावल, आ.कुणाल पाटील, आ.शिरीष नाईक, आ.राजेश पाडवी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी आ.उदेसिंग पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, सकल मराठा समाजाचे श्याम भाऊ जाधव, जि.प.चे माजी सभापती अभिजित पाटील, देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, माजी पं.स.सदस्य शिवाजी पाटील, पालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, जि.प.सदस्या हेमलता शितोळे, पं.स.च्या उपसभापती वैशाली पाटील, माजी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत शहरातील प्रवेशद्वाराजवळ शिवतीर्थ येथे शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा होणार आहे. उपस्थितीचे आवाहन शिव स्मारक बहुउद्देशीय समितीचे (Shiv Smarak Multipurpose Committee) अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील आदींसह शिवप्रेमींंनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या