Thursday, May 30, 2024
Homeनाशिकदीपक पांडे यांनी स्विकारला आयुक्तपदाचा पदभार

दीपक पांडे यांनी स्विकारला आयुक्तपदाचा पदभार

नाशिक । Nashik

मुंबई येथून रातोरात दाखल होत शुक्रवारी (दि.4) भल्या पहाटे नवनियुक्त पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी आयुक्तालयात हजेरी लावून मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला.

- Advertisement -

तर नांगरे पाटील हे पहाटेच मुंबई येथील पदभार स्विकारण्यासाठी रवाना झाले. आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच असा पदभार दिला गेल्याची चर्चा रंगली होती.

बहुचर्चित नाशिक आयुक्तपदाची चर्चा बुधवारी सायंकाळीच पांडे यांचे नाव जाहिर होताच शमली होती. परंतु पांडे हे केव्हा पदभार घेणार याबाबत चर्चा होती. दिपक पांडे हे मुंबईत सुधार सेवा विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते. ते 1999 भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीचे (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई, अकोला, राजभवन आदी ठिकाणी सेवा बजावल्या आहेत.

नांगरे पाटील यांना मुंबईला कायदा सुव्यवस्था सह.आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यासाठी हजर व्हायचे असल्याने सकाळीच पदग्रहणाची औपचारिकता पुर्ण करण्यात आली. त्यानंतर तत्काळ नांगरे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पांडे यांनी सोमवार पर्यंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला आहे.

प्रथम नाशिकची कायदा सुव्यवस्था, एकुण नाशिक समजुण घेऊन आपण माध्यमे तसेच सर्वांशी संवाद साधू असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान त्यांंनी दिवसभर आयुक्तालयातील उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच इतर अधिकार्‍यांशी चर्चा करत आढावा घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या