Thursday, May 23, 2024
Homeमनोरंजनड्रग्ज चॅट ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका पादुकोण

ड्रग्ज चॅट ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका पादुकोण

मुंबई –

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता मोठी नावे समोर येत आहेत. शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पादुकोणची

- Advertisement -

मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी बनवलेल्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका स्वतः असल्याचे, करिश्माने एनसीबीला सांगितले. यामुळे दीपिकाच्या अडचणींत वाढ झाली आहे.

क्वान टॅलेंट कंपनी आणि दीपिका यांच्यात कामाविषयीच्या अपडेट देण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला होता. परंतु काही कालावधीनंतर ड्रग्जच्या देवाण-घेवाणीसाठी या ग्रुपचा वापर सुरू झाला. या ग्रुपमध्ये दीपिका पादुकोण, जया साहा आणि करिश्मा प्रकाश यांचा समावेश होता. दीपिका पादुकोण स्वतः या ग्रुपची अ‍ॅडमिन होती. या ग्रुपवर ती ड्रग्जची चौकशी आणि मागणी करायची, असे करिश्माने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.

जया साहाने चौकशीदरम्यान करिश्माचे नाव घेतले होते. एनसीबीने आधी जया साहाची चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान तिने अनेक बड्या मंडळींची नावे घेतली असून, या सगळ्यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत.

दीपिकाची उद्या चौकशी

एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण

गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली आहे. उद्या (26 सप्टेंबर) तिची एनसीबीकडून चौकशी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या