Thursday, October 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजJ&K Election Result 2024 : भाजपला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांचा पराभव

J&K Election Result 2024 : भाजपला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांचा पराभव

ओमर अब्दुल्ला दोन्ही मतदारसंघातून विजयी

नवी दिल्ली | New Delhi

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana and Jammu and Kashmir Assembly Elections) काही दिवसांपूर्वी मतदान झाले होते. त्यानंतर आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरु असून दोन्ही राज्यांतील निकाल हाती येत आहेत.आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार हरियाणात भाजपने (BJP) बहुमताचा आकडा गाठला आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. अशातच आता जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Haryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार

भाजपाचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना (Ravindra Raina) यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरिंदर चौधरी यांनी ७ हजार ८१९ मतांनी पराभव केला आहे.त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने पीडीपीसोबत सरकार स्थापन केले होते. पण पीडीपीला दिलेला पाठिंबा काढून घेत भाजपने तेथील सरकार पाडले होते. त्यानंतर अनेक वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या.२०१९ साली ३७० कलम हटवल्यानंतर यंदा प्रथमच काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र,या निवडणुकीत भाजपला फटका बसल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : Haryana Election Result 2024 : विनेश फोगाटने विधानसभेचं मैदान मारलं; मिळविला दणदणीत विजय

दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी दोन मतदारसंघातून विजय मिळविला आहे. ओमर अब्दुल्ला बडगाम आणि गंदेरबल विधानसभा मतदारसंघातून (Budgam and Ganderbal Assembly) विजयी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीने बहुमत मिळविल्यानंतर ओमर अब्दुल्ला लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

हे देखील वाचा :  Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी

दरम्यान ,जम्मू-काश्मीरमधील ९० पैकी ८७ जागांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स ४१, भाजप २७, काँग्रेस ६, पीडीपी ३, पीपल कॉन्फरन्स १, सीपीआयएम १, आम आदमी पक्ष १, आणि अपक्ष ७ जागांवर विजयी झाले आहेत. तर हरियाणातील ९० जागांपैकी ५९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजप २९, काँग्रेस २८, आणि अपक्ष दोन जागांवर विजयी झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या