Friday, May 3, 2024
Homeनाशिकसातबारा वरील कालबाह्य नोंदी हटविल्या

सातबारा वरील कालबाह्य नोंदी हटविल्या

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

शेतकरी (farmer) व सामान्य नागरिकांच्या सातबारा उतार्‍यावरील (7/12 utara) कालबाह्य नोंदी (Expired entries) कमी करण्याची मोहीम महसूल विभागाने (Department of Revenue) राबविली आहे. सातबारा उतार्‍यावरील अनावश्यक बोजा अशा एकुण 773 नोंदी कमी केल्यामुळे शेतकर्‍यांना खरेदी-विक्री, कृषी कर्ज (Agricultural loans) घेण्यास अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याची माहीती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

- Advertisement -

जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा (Proof of land ownership) असलेल्या सातबारा उतार्‍यावर गेल्या अनेक वर्षापासून इतर हक्कांमध्ये तगाई, बंडिंग, सावकारी बोजे आणि नजर गहाण यासह अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाच्या विविध बोजांच्या नोंदी आहेत. जमिनीच्या सातबारा उतार्‍यावरील जुन्या सावकारी कर्जाच्या नोंदीमुळे अनेक अडचणी होत्या.

त्यामुळे शेतकरी व नागरिकांना जमिनीची खरेदी विक्री करतांना व संपादित जमिनीचा मोबदला वाटप करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. या करीता जिल्हा विभागीय अयुक्त राधाकृष्णन गमे (District Divisional Commissioner Radhakrishnan Game) व जिल्हा अधिकारी सुरज मांढरे (District Officer Suraj Mandhare) यांच्या मार्गदर्शनाने इगतपुरी तालुका (igatpuri taluka) महसुल विभागाने (Department of Revenue) अशा प्रकारच्या नोंदी निर्गंत करण्याची मोहीम राबवत कालबाहय नोंदी कमी केल्या.

जिल्हयातील सर्व महसुल विभागांना अशा कालबाह्य नोंदी कमी करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते, अशी माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या