नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रोस्टेशन जवळ झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. कारमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्यातून १३ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्याआधीचा डॉ. उमरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीमुळे संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. कारण या व्हिडीओत उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत स्फोट घडवण्यापूर्वी उमरने स्वत:च हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमधून उमरचे विचार, योजना आणि कट्टरपंथी विचारसरणी उघड होते, असे तपास पथकाचे मानणे आहे.
व्हिडीओत उमरने काय म्हंटले आहे?
दिल्ली बॉम्बस्फोटांपूर्वी उमरचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते आत्मघाती हल्ल्याच्या योजनांविषयी चर्चा करत आहेत. या व्हिडिओत उमर म्हणतो, ” सर्वात मोठी गैरसमजूत म्हणजे, सुसाईड बॉम्बिग किवा आत्मघाती स्फोट, लोकांना ते समजत नाही. ते कोणत्याही प्रकारे लोकशाहीवादी नाही आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजात ते स्वीकारार्ह नाही. त्या विरोधात अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.”
पुढे तो व्हिडीओत म्हणतो, ” आत्मघाती हल्ल्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे , जेव्हा एखादी व्यक्ती असे मानतो की तो एखाद्या निश्चित स्थानी आणि निश्चित वेळी मरणार आहे, तेव्हा तो एका खतरनाक मानसिकतेत असतो. मृत्यू हीच आपली एकमेव मंजिल, एकमेव गंतव्य स्थन आहे, असं तो मानू लागतो. ”
पुढे तो सम्हाला ” पण खरं सांगायचं तर वास्तव हे आहे की अशी विचारसरणी किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही, कारण ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.” त्याच्या या रेकॉर्डेड संवादाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
तथापि, या व्हिडिओचे ठिकाण अज्ञात आहे. असे दिसते की त्यांनी तो बंद खोलीत व्हिडीओ शूट केला होता. त्याने टेलिग्रामवर हा व्हिडीओ टाकला होता. त्याची कट्टरपंथीय व्हिडीओ चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या व्हिडीओच्या आधारे चौकशी केली जात आहे. हा व्हिडीओ दोन महिन्यांपूर्वीचा असून पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.
दरम्यान तपास यंत्रणांनी दहशतवादी उमरच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मला बराच काळ संशय होता की माझा मुलगा कट्टरपंथी बनला आहे. तो अनेकदा कुटुंबाशी संपर्क न ठेवता दिवस घालवत असे, अस त्याच्या आईने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. दिल्ली स्फोटापूर्वी काही काळ आधी त्याने त्याच्या घरच्यांना थेट सांगितलं होतं की मला कॉल करू नका. उमरचा हा बदललेला स्वभाव दिसूनही त्याच्या कुटुंबियांनीयाबद्दल कधीच पोलिसांना माहिती दिली नाही.
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. एलएनजेपी रुग्णालयात आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लुकमान (५०) आणि विनय पाठक (५०) अशी ओळख पटली आहे असं सोमवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या गुरुवारी बिलाल नावाच्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या १३ वर पोहोचली होती. आता या २ मृत्यूंसह स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे, तर अनेकांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




