Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDelhi Blast : दिल्लीच्या लालकिल्ला परिसरातील भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू

Delhi Blast : दिल्लीच्या लालकिल्ला परिसरातील भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू

पुणे-मुंबईत हायअलर्ट जारी

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीतील (Delhi) लाल किल्ला (Lal Killa) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट (Car Blast) झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू (Death) झाला असुन तर 15 जण जखमी (Injured) झाल्याचे समजते. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यानंतर मुंबई (Mumbai) पुण्यासह (Pune) देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं काही जणांना वाटलं. पण त्यानंतर हा स्फोट (Blast) गंभीर असल्याचं समोर आलं. ज्या ठिकाणी हा स्फोट (Blast) झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून (Lal Killa) फक्त 800 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला. या ठिकाणी अग्नीशमन दल पोहोचलं असून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच या ठिकाणी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही या ठिकाणी दाखल झाली असून ते पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत.

YouTube video player

पुणे-मुंबईत हायअलर्ट जारी

दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...