Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेशCM अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच!

CM अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच!

दिल्ली । Delhi

दिल्लीचे(Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या जामीनासाठी आणि कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात (Excise Scam Corruption Case) सीबीआयने त्यांची अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सीबीआयला (CBI) नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने केलेल्या केजरीवाल यांच्या अटकेला जामीन मिळावा या याचिकेवर बुधवारी (दि.१४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांनी केंद्रीय एजन्सीद्वारे केलेल्या अटकेला आव्हान देणारी स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

YouTube video player

यावर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘सध्या तरी अंतरिम जामीन नाही’ असे स्पष्ट करत सीबीआयला शुक्रवार २३ ऑगस्टपर्यंत ‘उत्तर द्या’ नोटीस जारी केली आहे. यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...