Tuesday, February 3, 2026
Homeदेश विदेशDelhi Red Fort Blast: स्फोटात वापरण्यात आलेल्या पांढऱ्या I20 बाबत धक्कादायक माहिती...

Delhi Red Fort Blast: स्फोटात वापरण्यात आलेल्या पांढऱ्या I20 बाबत धक्कादायक माहिती समोर; स्फोटाआधी तीन तासांपासून एकाच ठिकाणी उभी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात हरियाणातील गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दिल्लीमध्ये ज्या i20 कारचा स्फोट झाला ती कार या मोहम्मद सलमानच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. तपास संस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालात या स्फोटात उच्च दर्जाचे स्फोटक, अमोनियम नायट्रेट वापरण्यात आले होते. पांढऱ्या रंगाच्या i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर २० जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हल्ल्याचे पुलवामा कनेक्शन?
लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५२ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा स्फोट सिलेंडरचा असल्याची चर्चा सुरू होती. मात्र नंतर यामागे काही घातपात असल्याचा संशय बळावला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला.

- Advertisement -

दिल्लीत झालेल्या स्फोटाच जी i20 गाडी वापरण्यात आली होती ती गाडी हरियाणातील मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला अटक केली. मात्र त्यानंतर पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली.

YouTube video player

मोहम्मद सलमानने त्याची i20 गाडी ही नदीम नावाच्या एका व्यक्तीला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या व्यक्तीने सांगितले की त्याने ती गाडी दुसऱ्या कोणाला तरी विकली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सध्याचा मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन वेळा ही कार विकली गेली आणि शेवटी ती काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवाशाकडे गेली.

लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या तपासात पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध भागातून गोळा केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १३ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

तीन तासांपासून एकाच ठिकाणी उभी होती कार
प्राथमिक तपासात स्फोट झालेली कार लाल किल्ल्याजवळ तीन तासांहून अधिक काळ उभी होती आणि त्यानंतर ती बाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोमवारी दुपारी ३:१९ वाजता लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये कार प्रवेश करत असल्याचे आणि सायंकाळी ६:४८ वाजता बाहेर पडताना दिसून आले आहे. कार पार्किंगमधून बाहेर पडली तेव्हा प्रचंड वाहतूक होती.

लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात ही कार येऊन थांबली आणि त्याचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याचे कनेक्शन फरिदाबाद मधील कारवाईशी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...