Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशDelhi Red Fort Blast: ६ वाजून ५२ मिनीटांनी गाडीत स्फोट; स्फोटानंतर सगळीकडी...

Delhi Red Fort Blast: ६ वाजून ५२ मिनीटांनी गाडीत स्फोट; स्फोटानंतर सगळीकडी धूर, परिसरात नागरिकांचा एकच गोंधळ, नेमकं काय झालं?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लाल किल्ल्याजवळ काल (सोमवारी) संध्याकाळी भीषण स्फोट झाला ज्याच्या आवाजाने दिल्ली हादरली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ बाहेर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की चार किलोमीटर अंतरापर्यंत याची तिव्रता जाणवली. या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही अन् वेगात तपास केला जात आहे. पोलिसांना तपासावेळी नवा धागा सापडला आहे. आय २० कार स्फोटाआधी तब्बल ३ तास एकाच जागी पार्किंगमध्ये उभी होती. या कारचे पार्किंगमधील फोटो सध्या समोर आले आहेत.

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी ६.५२ च्या सुमारास गाडीत स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर या गाडी शेजारी उभ्या असलेल्या तीन गाड्यांना आग लागली अन् परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक भागात, लोक भूकंप किंवा गॅस स्फोट समजून घरे आणि दुकाने सोडून बाहेर पळू लागले. या दुर्घटनेमुळे केवळ जुन्या दिल्लीतच नव्हे तर कॅनॉट प्लेस, दर्यागंज, आयटीओ, सिव्हिल लाईन्स आणि जामा मशीद परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानुसार, मेट्रो स्टेशनचे दरवाजे क्रमांक १ आणि ४ तात्पुरते बंद करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की स्फोट इतका तीव्र होता की सिव्हिल लाईन्स आणि आयटीओपर्यंत लोकांना हादरे जाणवले. स्फोटाच्या तीव्रतेने जवळपासच्या अनेक दुकानांच्या आणि घरांच्या काचा फुटल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. लाल मंदिर आणि मेट्रो स्टेशनवरील काचेचे दरवाजे तुटले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी लाल किल्ला, दिल्ली गेट, आयटीओ आणि राजीव चौक मेट्रो स्थानकांवर सेवा काही काळासाठी थांबवल्या.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....