Saturday, November 23, 2024
Homeदेश विदेशAir India चे विमान अमेरिकेऐवजी थेट रशियात झालं लँड… नेमकं काय घडलं?

Air India चे विमान अमेरिकेऐवजी थेट रशियात झालं लँड… नेमकं काय घडलं?

दिल्ली ।Delhi

एअर इंडियाच्या (Air India) एका विमानातील प्रवाशांना काही अनपेक्षित अनुभव आला आहे. दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोला (San Francisco) चाललेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरूवारी रशियाच्या (Russia) क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.

- Advertisement -

एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया साईटवर सविस्तर पोस्ट टाकून या घटनेचे कारण सांगितले. दिल्लीहून निघाललें एअर इंडियाचं विमान अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं लँड होणं अपेक्षित होतं. पण, गुरुवारी विमानात काही तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळं ते रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करण्यात आलं. ( Delhi-San Francisco Air India flight diverted to due to technical issue)

हे देखील वाचा : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट

प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या साथीनं एअर इंडिया काम करत असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं. या विमानात २२५ प्रवासी आणि १९ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. रशियात विमान लँड झाल्यानंतर त्या सर्वांना तातडीनं टर्मिनल बिल्डींमध्ये पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या