Tuesday, May 7, 2024
Homeजळगावकेळी मागणीत वाढ ; भाववाढीची अपेक्षा

केळी मागणीत वाढ ; भाववाढीची अपेक्षा

चिनावल, ता.रावेर – वार्ताहर raver

जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील केळी (Bananas) पट्ट्यात रावेर यावल परिसरातून आजमितीला केळीची मागणीत वाढ होताना दिसत आहे दरम्यान मागणी वाढल्याने भावात ही वाढ होण्याची अपेक्षा केळी उत्पादकांकडून होत आहे.

- Advertisement -

गेल्या ३-४ दिवसांपासून केळी पट्ट्यात तापमानात वाढ झाल्याने नवती केळी बागा मधील केळी घड ही कापणी योग्य होत आहे आघात लागवड असलेल्या केळी बागांमध्ये माल बऱ्यापैकी तयार आहे, यामुळे व्यापाऱ्यांकडून नवती केळी मालाची मागणी होत आहे.

देशातील केळीची मुख्य बाजारपेठ असलेल्या (North India) उत्तर भारतातील (Lucknow) लखनवू, (Gorakhpur) गोरखपुर, (Kanpur)कानपुर, (Faridabad) फरिदाबाद, येथील मार्केट उघडले गेल्याने तसेच आंध्र गुजराथ व महाराष्ट्रातील जळगाव वगळता काही जागी उत्पादीत होणारी केळी आजमितीला तेथे उपलब्ध नसल्याने केळी व्यापाऱ्याचे लक्ष केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यावर केंद्रित झाले आहे ईतर जागी केळी नसल्याने रावेर यावलच्या केळीला आजपासून मागणी वाढणार आहे. येत्या जुलै अखेर पर्यंत ही मागणी कायम राहील अशी अनुभवी उत्पादक व व्यापारीचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या