राजापूर | प्रतिनिधी
येथे दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून शेत मजुरांना शेतात कामे नसल्याने गरीब जनतेचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने या भागात दुष्काळी कामे सुरू करण्याची मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, माजी सरपंच सुभाष वाघ आदींनी केली आहे. यावर्षी सर्वात कमी पर्जन्यमान राजापूर मंडलात आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती भयानक आहे.
शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी पुर्ण वाया गेली असुन या भागातील विहिरी, नदी, नाले कोरड्या ठाक आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवली जात असून सध्या हे टँकर कमी पडत आहे. शासनाने राजापूर येथे टँकरच्या खेपा वाढवून देण्यात याव्यात जनावरांना चारा छावण्या सुरू करावी, गोरगरीब जनतेला हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धान्यात दरवाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थिती असुन सूध्दा याकडे लक्ष दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.
शेतकरी व गोरं गरीब फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला कामे नसल्याने गोर गरीब आतापासूनच संपूर्ण वर्ष कसे काढणार असा प्रश्न पडतो आहे. राजापूर गावांसह वाड्या वस्त्या वर काटकसरीने पाणी वापर करावा लागतो आहे. मागे रिमझिम पावसाच्या सरीवर पिकं हिरवीगार दिसत असली तरी तो चारा आतापासूनच जनावरांना खायला देण्याची वेळ पशू पालकांवर आली आहे.
अनेकांना हाताला कामे नसल्याने मोलमजुरी करणारे कुटंब, शेतकरी, पशुपालक, हे मेटाकुटीला आले असून कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा अशी चिंता त्यांना वाटत आहे. दुष्काळी कामे सूरू न केल्यास गोरगरीबांना उपासमारीची वेळ आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व छगन भुजबळ यांनी प्रयत्न करुन मांजरपाडा पाटाचे पाणी खिर्डी साठे पाझर तलावात सोडले,तिथून लिफ्ट करून पन्हाळ साठे, राजापूर, ममदापूर या गावांना पाणीपुरवठा केला तर शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची कायमची टंचाई दूर होईल परिसरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने या भागाकडे लक्ष देऊन आणेवारी कमी लावावी व दुष्काळी कामे सुरू करावी अशी मागणी होत आहे.