Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यारस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोल बंद करा

रस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोल बंद करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक-पुणे हायवे ( Nashik- Pune Highway )व नाशिक-मुंबई महामार्ग ( Nashik- Mumbai Highway ) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिंदे व घोटी टोलमध्ये ( Shinde & Ghoti Toll Plaza ) असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत.

- Advertisement -

वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना रस्त्याने सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा, असा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे. रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल बंद करावा, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना करण्यात आली आहे.

याबाबत नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे सार्वजनिक घोटी टोल नाक्यावर वाहतूकदारांना बांधकाम विभागमंत्री अशोक चव्हाण, विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिंदे, पळसे व घोटी टोलनाक्यांवर टोल घेतला जातो. त्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याबाबत टोल व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

व्यवस्थापनाकडून नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे येथे कुठलीही डागडुजी होताना दिसत नाही. पळसे व नाशिक मुंबई मार्गावरील टोल द्यायला आम्ही तयार आहोत. मात्र टोल अंकितरोड आणि त्यांच्या सर्व सुविधा चांगल्या प्रतीच्या द्याव्यात. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. टोल भरण्यास प्रशासनाने बळजबरी केली तर वाहतूकदार व नागरिक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या