Friday, May 3, 2024
Homeजळगावपि-जे रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्र्यांना साकडे

पि-जे रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्र्यांना साकडे

पाचोरा – प्रतिनिधी pachora

पीजे (p-j) बचाव कृती समिती यांची (New Delhi) नवी दिल्ली येथे (Railway Minister Raosaheb Danve) केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व (mp Unmesh Patil) खा.उन्मेश पाटील, खा.रक्षा खडसे (mp Raksha Khadse) यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत पीजे रेल्वे सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली.

- Advertisement -

पाचोरा ते जामनेर (jamner) ५४ किलोमीटर असलेली गोरगरिबांची सर्वसामान्य, विद्यार्थी, शेतमजूर व व्यापारी यांची अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी पीजे रेल्वे मागील दोन वर्षापासून बंद आहे. ती सुरू करण्या संदर्भात पाचोरा येथे पीजे बचाव कृती समिती यांच्या मार्फत पाचोरा जामनेर, पहूर, शेंदुर्णी, भगदरा, वरखेडी ,पिंपळगाव या ठिकाणी एकाच वेळी धरणे आंदोलन, स्वाक्षरी मोहीम यासारखे आंदोलन करण्यात आले, त्यानंतर डीआरएम भुसावळ तसेच जी एम यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देऊन पिजे सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.

जळगाव लोकसभेचे खासदार उमेश पाटील यांच्या पुढाकाराने त्यांनी कृती समितीला दिल्ली येथे बोलवून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व रेल्वेमंत्री यांच्याशी कृती समितीची रेल भवन, रेल्वे मंत्रालयात कृती समितीने सांगितले की पी जे सुरू झालीच पाहिजे. रेल्वेचे अधिकारी यांनी काही तांत्रिक अडचण निर्माण करून नकारात्मकता दाखवली.

खासदार उमेश पाटील व कृती समिती यांनी पाचोरा ते जामनेर ब्रॉडगेज करावी त्या अगोदर पिजे गाडी सुरू करावी मंत्री रावसाहेब दानवे यांनी डीआरएम केडिया यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना विचारणा केली की, पी जे सुरू करण्यासाठी काय केले पाहिजे. त्यांनी सांगितले की पीजेसुरू करण्यासाठी २४ कोटी खर्च येईल व त्यासाठी सुमारें एक वर्ष लागेल. दानवे साहेब यानी सांगितलं आम्ही त्याची व्यवस्था करतो पैशाची चिंता करु नका. पीजे सुरू करण्यासाठी जे-जे काही लागेल त्यासाठी तयारी करावी अशी सकारात्मकता दाखवली.

खासदार उन्मेश पाटील, रक्षाताई खडसे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रेल्वेमंत्री रेल्वे अधिकारी चर्चा केली. ज्या टेक्निकल बाबी असतील त्या दुरुस्त करून गाडी सुरू करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

यानंतरची बैठक भुसावळ येथे डीआरएम वरिष्ठ अधिकारी कृती समिती समिती पदाधिकारी व दोन्ही खासदार यांच्या उपस्थित होणार आहे. कृती समितीने सांगितले पीजे सुरू झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार. डी आर एम जीएम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या यांच्याशी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे सविस्तर बैठक घेऊन पिजे सुरू करण्या संदर्भात पुढचे पाऊल उचलणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या