Thursday, May 2, 2024
Homeधुळेधुळ्यात डेंग्युने घेतला उद्योजकाचा बळी

धुळ्यात डेंग्युने घेतला उद्योजकाचा बळी

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरात डेग्युंने थैमान घातले असून उद्योजक गौरव किशोर जगताप यांचाही डेग्युने बळी घेतला आहे. धार्मिक, सामाजिक, उद्योग, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे नावलौकीक होते. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

उद्योजक गौरव किशोर जगताप (वय 37) हे दानशुर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. दि.10 ऑक्टोबरला त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रात्री शहरातील सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.

चाळीसगावात डेंग्यूचा दुसरा बळी

त्यांची तपासणी केली असता डेंग्युचे निदान झाले. त्यांच्या प्लेटलेट्सची संख्याही 86 हजारापर्यंत खाली आली होती. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांना नाशिक येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान काल रात्री पावणे बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात कळाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियातही श्रध्दांजलीचा महापूर आला होता.धर्मवीर देवमाणूस हरपल्याची भावना धुळेकरांमधून व्यक्त करण्यात आली. गौरव जगताप यांच्यावर आज दुपारी देवपुरातील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. गौरव जगताप यांच्या पश्चात पत्नी, 9 वर्षाचा मुलगा, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या