Monday, November 25, 2024
Homeधुळेमुलीच्या लग्नास नकार: आईला मारहाण

मुलीच्या लग्नास नकार: आईला मारहाण

धुळे dhule । प्रतिनिधी

मुलीच्या (girl’s) लग्नास नकार (Rejection of marriage) देणार्‍या आईला (mother) दोघांनी मारहाण (beating) केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील रोहाणे येथे घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मंगलाबाई नानाभाऊ गिरासे (वय 45) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दीपक उदयसिंग गिरासे (रा.वावद ता.जि.धुळे) व नितीन विजयसिंग गिरासे (रा.वाडी ता.शिंदखेडा) या दोघांनी मंगलाबाई यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती. परंतू मंगलबाई यांनी नकार दिला.

त्यारागातून दि.29 एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास दोघांंनी घरात घुसुन मंगलाबाई यांना मारहाण केली. त्यांच्या कानातील झुमर ओढून घेतले. त्यामुळे कानाला दुखापत झाली. झटापटीत कानातील झुमर व पोत गहाळ झाली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला असून तपास पोना पवार करीत आहेत.

अल्पवयीन मुलीचे अपहरण

शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार दि.13 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरुन या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने काहीतरी फुस लावून पळवून नेले. अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोसई गायकवाड करीत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या